Fruit seeds Disadvantages | ‘या’ फळांच्या बिया खाल्ल्याने ओढवू शकतो मृत्यू; आताच सतर्क व्हा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Fruit seeds Disadvantages | फळे ही आरोग्यासाठी अमृत असतात. प्रत्येकाला कोणती न कोणती फळे आवडत असतात. काही हंगामी फळांसाठी तर आपण वाट बघत असतो. फळे ही शरीराला अत्यंत पौष्टिक असतात. आरोग्य बिघडलं तर आपण फळे खायला अधिक प्राधान्य देतो. काही फळांसोबत आपण त्याच्या बिया (Fruit seeds Disadvantages) देखील खात असतो.

मात्र याच बिया खाणं तुम्हाला अत्यंत महगात पडू शकतं. तुमच्यावर थेट मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे ही फळे नेमकी कोणती?, त्याच्या बिया का खाऊ नयेत, त्या बियामध्ये असं काय असतं? याबाबत तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही आरोग्याबाबत आतच सावध व्हायला हवं.

‘या’ फळांच्या बिया खाऊ नये

सफरचंद- सफरचंद हे फळ सर्वांनाच आवडतं. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. मात्र सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइड हा घटक आढळतो. हा एक अत्यंत विषारी घटक आहे. (Fruit seeds Disadvantages) त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात जळजळ, मळमळ, जुलाबांसारखी अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या फळाच्या बिया खाऊ नयेत.

पेर- पेर हे फळ थोडे फार सफरचंदसारखेच लागते. मात्र जिभेला थोडेफार ते चरचर लागते. या फळाच्या बियामध्येही
सायनाइड हा घटक आढळतो. यामुळे पोटदुखी, मळमळ होऊ शकते. त्यामुळे याच्याही बिया खाऊ नये.

पीच- पिच हे फळ दिसायला अत्यंत सुंदर असते. चवीला हे ते चयन असते. मात्र, याच्या बियांमध्ये अमिग्डालिन आणि सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स सारखे विषारी घटक असतात. यामुळे पोटदुखी, अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे या फळाच्या बिया खाऊ नयेत.

चेरी – चेरी हे फळ बऱ्याच जणांन आवडत असते. मात्र, चेरीच्या बियांमध्ये (Fruit seeds Disadvantages) सायनाइड कंपाऊंड असते. यामुळे अतिसार होऊ शकतो. याचे अधिक सेवन केले तर प्रसंगी मृत्यूही ओढू शकतो. त्यामुळे कोणत्या फळांच्या बिया खाव्यात कोणत्या खाऊ नये, याची खबरदारी घ्यावी. तसेच जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

News Title-  Fruit seeds Disadvantages

 महत्त्वाच्या बातम्या –

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन