“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

JEE । राजस्थानमधील कोटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर कोटा येथे आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. संबंधित मृत तरूणी इथे जेईई मेन परीक्षेची तयारी करत होती. ती बोरखेडा येथील रहिवासी असल्याचे कळते. तिची जेईई मेन परीक्षा 31 जानेवारीला होणार होती. अभ्यासादरम्यान आलेल्या नैराश्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले अन् जीवन संपवले.

विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. “मम्मी आणि पप्पा, मी जेईई करू शकत नाही, म्हणूनच मी आत्महत्या करत आहे. मी सर्वात वाईट मुलगी आहे, मला माफ करा मम्मी, पप्पा. हा शेवटचा पर्याय आहे, मला माफ करा”, असे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे.

18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बोरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, निहारिका अभ्यासात खूप हुशार होती. बोरखेडा येथील या वर्षातील ही दुसरी घटना आहे. तर मागील वर्षी तब्बल 29 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या.

दरम्यान, मागील आठवडाभरात कोटामध्ये आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सोमवारी कोटा येथे निहारिका (18) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ती जेईई मेनची तयारी करत होती, आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या पालकांसाठी सुसाईड नोट लिहिली होती.

JEE मेनची तयारी अन्…

मृत निहारिकाची बुधवारी (३१ जानेवारी) जेईई मेन परीक्षा होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, निहारिका अभ्यासात खूप हुशार होती. परीक्षेच्या दोन दिवस आधी तिला नैराश्य आले अन् तिने कोटा येथील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या खोलीतून सुसाईड नोट सापडली.

2023 मध्ये 29 जणांच्या आत्महत्या

कोटा हे शिक्षणाचे शहर म्हणून ओळखले जाते. पण इथे नैराश्येपोटी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 2023 मध्ये तब्बल 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

News Title- An 18-year-old student in Kota, Rajasthan, died due to depression while studying for the JEE Mains exam
 महत्त्वाच्या बातम्या –

Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यनला ‘ती’ गोष्ट पडली महागात; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Filmfare Awards 2024 | कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता?, पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची पूर्ण लिस्ट

IRCTC Tour Package | IRCTC देणार विदेशी पर्यटनाची सुवर्णसंधी; जाणून घ्या तुमच्या बजेटमधला प्लॅन

Pushkar Jog | जात विचारली म्हणून मराठी अभिनेत्याने बीएमसी महिला कर्मचारीवर केला…

Uddhav Thackeray | ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर!