Uddhav Thackeray | ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर!

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे नेते खासदार अनिल देसाई यांचे पीए दिनेश बोभाटे यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडूनही या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आता सुरु आहे. त्यामुळे दिनेश बोभाटे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर

सीबीआयचा दिनेश बोभाटे यांच्याविरोधात मिळकतीपेक्षा 36 टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप आहे. दिनेश बोभाटे एका इन्शुरन्स कंपनीमध्ये सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे.

अनिल देसाईंच्या पीएवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

सीबीआयने या प्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याने जवळपास 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशोबी कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

दिनेश बोभाटे यांच्याविरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे. दिनेश बोभाटे हे अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रवींद्र वायकर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण, आमदार राजन साळवी यांच्यासह आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. आता यात दिनेश बोभाटे यांचाही समावेश समावेश झालाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mahatma Gandhi | ‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’; नव्या दाव्याने खळबळ

MS Dhoni | धोनी CSK साठी IPL किती वर्ष खेळणार?; ‘या’ खेळाडूनं सांगितलं

‘बिग बॉस 17’ चा विजेता Munawar Faruqui कधी काळी विकत होता समोसे; जाणून घ्या त्याचा प्रवास

Farmer | धक्कादायक! शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला; दुष्काळामुळे अन्नदाता हैराण

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांचा सरकारला इशारा, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .