Pushkar Jog | जात विचारली म्हणून मराठी अभिनेत्याने बीएमसी महिला कर्मचारीवर केला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pushkar Jog | मराठी अभिनेता पुष्कर जोग त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चे असतो. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी तो रोज नवनवीन फोटो शेअर करत असतो. मराठी चित्रपटात तसेच मराठी मालिकांमध्ये त्यांने अनेक महत्त्वाच्या भूमीका साकारल्या आहेत. फक्त सिनेसृष्टीतच नव्हे तर पुष्कर बिग बाॅसमधून घरा घरात झळकला आहे. दरम्यान, पुष्कर एका वादाच्या भवऱ्यात अडकल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर सध्या पुष्करची पोस्ट देखील तूफान व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकार?

राज्यात अनेक भागात सध्या मराठा जातीय सर्वेक्षण करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे महानगरपलिकेतीलस कर्मचारी घरोघरी जाऊन या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती गोळा करत आहेत. याच सर्वेक्षणासाठी बीएमसीमधील महिला कर्मचारी पुष्करच्या (Pushkar Jog) घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली यावेळी त्यांनी पुष्करला जात विचारली.

जात का विचारली? असं म्हणत पुष्करने प्रचंड संताप व्यक्त केला. शिवाय त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या पोस्टची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा तर चालूच आहे मात्र, ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे.

pushkar

पुष्करने दिलेली प्रतिक्रिया –

घडलेल्या प्रकारानंतर, पुष्करने (Pushkar Jog) यावर प्रतिक्रिया दिली. जर बाईमाणूस नसते ना तर मग, 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या, असं पुष्कर म्हणाला. शिवाय कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”’असं म्हणत पुष्करने पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

bmeu

अभिनेत्यावर कायदेशीर कारवाई

पुष्करने केलेल्या त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. या बरोबरच बीएमसीने त्याच्या पोस्टला विरोध करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका पत्राच्या माध्यमातून केली आहे. ‘महानगरपालिका कर्मचारी हे मराठी सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अॅपनुसार माहिती विचारत असताना जात विचारल्यामुळे पुरुष कर्मचारी असता तर दोन लाथा घातल्या असत्या असं वक्तव्य मराठी सिने कलाकार पुष्कर जोग यांनी केलं. त्यामुळे गांभीर्याने घेतलं पाहिजे. सध्या सर्वत्र पुष्कर जोग याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

News Title : pushkar jog post goes viral on social media

महत्त्वाच्या बातम्या-

Mahatma Gandhi | ‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’; नव्या दाव्याने खळबळ

MS Dhoni | धोनी CSK साठी IPL किती वर्ष खेळणार?; ‘या’ खेळाडूनं सांगितलं

‘बिग बॉस 17’ चा विजेता Munawar Faruqui कधी काळी विकत होता समोसे; जाणून घ्या त्याचा प्रवास

Farmer | धक्कादायक! शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला; दुष्काळामुळे अन्नदाता हैराण

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांचा सरकारला इशारा, म्हणाले…