IRCTC Tour Package | IRCTC देणार विदेशी पर्यटनाची सुवर्णसंधी; जाणून घ्या तुमच्या बजेटमधला प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IRCTC Tour Package | प्रत्येकाला एकदा तरी विदेशात जाण्याची इच्छा असतेच. मात्र ही इच्छा बजेटमुळे मागेच राहून जाते. मात्र, आता तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हीही जर यावर्षी जर विदेशात जाण्याचा विचार करत असाल, ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

कारण, IRCTC तुम्हाला ही सुवर्णसंधी देणार आहे. IRCTC ने नेपाळ टूर पॅकेज आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. याचे पॅकेज बऱ्याच लोकांना आवडत आहे. तुम्ही इथे फेब्रुवारीमध्ये जाऊ शकता. नेपाळमध्ये फेब्रुवारीमध्ये हवामान अतिशय सुंदर असते. अशा स्थितीत प्रवासासाठी हा महिना अतिशय चांगला आहे.

IRCTC पॅकेजचं नाव- दिल्ली ते नेपाळ
पॅकेजचा कालावधी – 5 रात्री आणि 6 दिवस
यात्राचा मार्ग- फ्लाइटने प्रवास
पॅकेजमधील पर्यटनस्थल- काठमांडू, पोखरा
प्रवास कधी करू शकता- 16 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024

IRCTC Tour Package मध्ये ‘या’ सुविधा मिळणार

राउंड ट्रिपसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट उपलब्ध करून दिले जातील.
राहण्यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाईल
या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा असेल.
यात्रेसाठी सोबत एक मार्गदर्शकही असेल.

IRCTC Tour Package साठी ‘एवढे’ बजेट लागणार

या पर्यटनाला जर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुम्हाला 45,700 रुपये द्यावे लागतील.
दोन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती याचे शुल्क 37,000 रुपये असेल.
तर तीन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती तुम्हाला 36,500 रुपये शुल्क असेल.
मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे शुल्क द्यावे लागणार आहे.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 26,500 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 23,500 रुपये द्यावे लागतील.

IRCTC ने दिली महत्वाची माहिती

IRCTC ने या टूर पॅकेजबाबत एक ट्वीट पोस्ट करत माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की तुम्हाला निसर्गरम्य आणि सुंदर दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल तर हा टूर पॅकेज तुमच्यासाठीच आहे. तुम्ही यासाठी IRCTC च्या वेबसाईट वरुन बुकिंग करू शकता. तसेच याची बुकिंग टूर पॅकेजचं फेसिलिटेशन सेंटर, जोनल ऑफिस आणि रीजनल ऑफिसमध्ये जाऊनही करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटलाही भेट देऊ शकता.

News Title-  IRCTC Tour Package
 महत्त्वाच्या बातम्या –

India Vs England Test Series | पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू होणार बाहेर

संसदेत तूफान राडा; खासदारांनी एकमेकांना उचलून फेकलं

Bigg Boss 17 | डोंगरीचा स्टार मुनव्वर झाला मालामाल; ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रक्कम

Ahmednagar Accident | मन सुन्न करणारी घटना; कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह…

Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!