Bigg Boss 17 | डोंगरीचा स्टार मुनव्वर झाला मालामाल; ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रक्कम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’ 17 च्या विजेत्याची घोषणा झाली आहे. सर्वांना कोण विजेता ठरणार याची आतुरता होती. अखेर याचा खुलासा झाला आहे. सलमान खानने मुनव्वर फारुकीच्या (Munawar Faruqui) नावाची घोषणा करताच एकच जल्लोष करण्यात आला. 28 जानेवारीला याचा अंतिम (Bigg Boss 17 ) एपिसोड झाला. याच दिवशी मूनव्वरचा वाढदिवसदेखील होता.

त्यामुळे मूनव्वरला वाढदिवशीच मोठे गिफ्ट मिळाले. त्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसह मोठी रक्कमही मिळाली आहे. त्यामुळे मुनव्वर बिग बॉसमुळे मालामाल झाला आहे. तर, अभिषेक कुमार शोचा फर्स्ट रनरअप ठरला. मात्र, विजेता डोंगरीचा स्टार मुनव्वर फारूकीच ठरला.

मूनव्वर झाला मालामाल

बिग बॉसचा (Bigg Boss 17 ) विजेता ठरल्यानंतर मूनव्वर मालामाल झाला आहे. त्याला बिग बॉसची ट्रॉफी तर मिळालीच आहे, यासोबतच त्याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली आहे. तसेच, मुनव्वरला 50 लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये 21 स्पर्धक होते, परंतु मुनव्वर फारुकीने बाजी मारत ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

15 ऑक्टोबर पासून या शोला सुरुवात झाली होती. 107 दिवस चालणाऱ्या या शोमध्ये चाहत्यांचे बरेच मनोरंजन झाले. अंतिम फिनालेमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा और अरुण माशेट्टी सामील होते. सर्वांना वाटले होते की, अभिनेत्री अंकिता लोखंडे याची विजेती ठरेल, मात्र मूनव्वरने बाजी मारत सर्वांनाच धक्का दिला.

यंदाच्या सीजनची (Bigg Boss 17 ) थीम ही हृदय , बुद्धी आणि साहसवर आधारित होती. यासाठी तीन वेगवेगळे घर बनवण्यात आले होते. याचेच नाव हृदय , बुद्धी आणि साहस ठेवण्यात आले होते. यातील स्पर्धकांना या तीन घरात वाटण्यात आले होते. या तीन घरातील सुरुवातीचे काही दिवस ही ‘बुद्धी’ या घरातील स्पर्धकांनी गाजवले. नंतर, मात्र सर्वांचेच आयुष्यातील घडामोडीमुळे शो गाजला.

Bigg Boss 17 | मूनव्वर झाला भावुक

मूनव्वर फारुकी हा अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. शायर, स्टँड अप कॉमेडीयन ते आता बिग बॉसचा (Bigg Boss 17) विजेता असा मुनव्वरचा प्रवास राहिला. मुनव्वर सोबतच स्पर्धेत अंकिता लोखंडे आणि विकी जैनदेखील चर्चेत राहिले. यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादमुळे बिग बॉस चांगलाच गाजला. सर्वांचेच सत्य या घरात उघड झाले. वाद झाले, चुकांची जाणीवही झाली. सर्वांनी जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न घेतले. मात्र, बाजी मूनव्वर मारून गेला. यावेळी त्याने अभिषेक कुमारची मागीही मागितली. यांच्यात सुरुवातील बरेच वाद झाले होते. मात्र, अंतिम एपिसोडमध्ये त्यांना दोघांनाही आपल्या चुकांची जाणीव झाली.

News Title- Bigg Boss 17 winner Munawar Faruqui

 महत्त्वाच्या बातम्या –

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू