Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Animal Movie | रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटाने 2023 च्या अखेरीस बक्कळ कमाई केली. 2023 च्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ॲनिमल चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे. त्याची जगभरातील कमाई 900 कोटी रुपये होती. या चित्रपटावर बरीच टीका देखील झाली होती, ज्यावर रणबीर कपूरने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने नेहमीच वादावर बोलणे टाळले आहे. तो कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर बोलत नाही.

2023 च्या शेवटी त्याचा ॲनिमल हा चित्रपट आला जो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाबाबत बरेच वाद झाले पण तरीही या चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटावर बरीच टीका झाली पण रणबीर कपूर कधीच काही बोलला नाही. याबाबत रणबीर कपूर पहिल्यांदाच बोलला आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर कपूरने सांगितले की, ॲनिमल या चित्रपटावर केवळ एका विशिष्ट वर्गाचाच आक्षेप होता, पण हा चित्रपट आवडणाऱ्या लोकांचा एक मोठा वर्गही आहे.

रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर

खरं तर ॲनिमल चित्रपटात गुन्हेगारी, ॲक्शन ड्रामा, महिलांविरुद्ध क्रूर हिंसक दृश्ये होती, तरीही 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला. चित्रपट इतका मोठा हिट होण्याचे संपूर्ण श्रेय संदीप वांगा यांना जाते. रणबीर म्हणाला की, संदीप वांगा यांनी चित्रपटाबाबत आपल्या चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना रणबीर कपूरने ॲनिमलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आणि अभिनंदन केले. ॲनिमल या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल सारखे कलाकार या चित्रपटात दिसले होते. सर्वांच्या कामाचे खूप कौतुक झाले. माहितीनुसार, ॲनिमल या चित्रपटाने भारतात सुमारे 550 कोटी रुपये कमवले, तर या चित्रपटाने जगभरात 902 कोटी रुपयांचा गल्ला कमावला.

Animal Movie ची बक्कळ कमाई

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रामायणावर आधारित असणार आहे, ज्यामध्ये तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी करणार आहेत. अलीकडेच अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. यावेळी रणबीर पत्नी आलिया भट्टसोबत दिसला होता.

दरम्यान, ॲनिमल चित्रपटाचा विरोध चित्रपटाला प्रसिद्धी देऊन गेला. अनेकांनी हिंसक दृश्यांचा दाखला देत टीका केली होती. मात्र, चित्रपटगृहातील ॲनिमलचा बोलबाला कायम राहिला. ॲनिमल चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले.

News Title- Bollywood actor Ranbir Kapoor has responded to critics of the movie Animal
 महत्त्वाच्या बातम्या –

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू

IND vs ENG | आतापर्यंतचा आमचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडच्या कर्णधारानं सांगितलं कारण