Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitish Kumar News | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला. राज्यातील राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांची युती तोडून नितीश पुन्हा एकदा भाजपसोबत गेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सरकार पाडले. नंतर भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून त्यांच्यावर ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष सडकून टीका करत आहेत.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नितीश यांना लक्ष्य केले आहे. तसेच भाजपला टोला लगावत अखिलेश यांनी फोडाफेडीच्या राजकारणाचा समाचार घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीए आघाडीत सामील झाल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या विरोधी आघाडीला ‘इंडिया’ला मोठा धक्का बसला आहे.

नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री

बिहारमधील राजकीय गोंधळादरम्यान अखिलेश यादव यांनी एक पोस्ट केली. अखिलेश यांनी या संपूर्ण प्रकरणाला भाजपला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, भाजपला लोकसभा निवडणूक हरू याची भीती सतावत आहे. त्यामुळे ते इतर पक्षांना फोडण्यात व्यग्र आहेत. त्यांनी कारस्थान रचले आणि भावी पंतप्रधानांना (नितीश कुमार) केवळ मुख्यमंत्रीपदावर रोखले. नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

अखिलेश यांनी पुढे लिहले की, भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. खरं तर लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुट दाखवून ‘इंडिया’ या आघाडीची स्थापना केली आहे.

Nitish Kumar News बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ‘इंडिया’ आघाडीचे शिल्पकार होते आणि त्यांनी सर्व पक्षांना एकत्र आणले. मात्र, समन्वयक न केल्याने त्यांची नाराजीही समोर आली होती. रविवारी त्यांनी महाआघाडीपासून वेगळे होण्याची घोषणा करत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला अन् वेगळ्या सरकारमध्ये सहभागी झाले.

 

विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात नितीश कुमार यांचा मोठा हात होता. त्यांनी विविध राज्यांतील नेत्यांना भेटून ‘इंडिया’ आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेतला. भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखणारे नितीश कुमारच भाजपसोबत गेल्याने इंडिया आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

News Title- Samajwadi Party President Akhilesh Yadav has criticized Bihar Chief Minister Nitish Kumar after joining the BJP
महत्त्वाच्या बातम्या –

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू

IND vs ENG | आतापर्यंतचा आमचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडच्या कर्णधारानं सांगितलं कारण

IND vs ENG Test | लाज वाटली पाहिजे!, ‘या’ 4 कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

iPhone 15: आयफोन 15ची नवी किंमत ऐकून खरेदीसाठी एकच झुंबड, पुन्हा या किंमतीत मिळणार नाही!

INDvsENG | रोहित शर्मा चांगलाच भडकला, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर