IND vs ENG Test | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने टीम इंडियाला आपल्याच जाळ्यात अडकवून पराभवाची धूळ चारली. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व असताना पाहुण्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवत मालिकेत दमदार सुरुवात केली.
ओली पोपच्या 196 धावांच्या शानदार खेळीनंतर इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज टॉप हार्टलीने भारतीय टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त करत इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला. सलामीच्या सामन्याच्या सुरूवातीला टीम इंडियाने दमदार सुरुवात केली होती आणि 190 धावांची आघाडी मिळवली होती. असे असतानाही टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी 28 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
घरच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी चांगली असताना ही परिस्थिती का उद्भवली असा प्रश्न निर्माण झाला आहे. टीम इंडिया कुठे चुकली, ज्यामुळे इंग्लंडच्या अननुभवी गोलंदाजीने देखील यजमानांना 200 पेक्षा कमी धावांवर बाद करून संस्मरणीय विजय नोंदवला. याची काही कारणे आहेत, ज्यांची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भारतीय संघाला तीन दिवसांत सामना जिंकण्याची संधी होती पण तसे झाले नाही. इंग्लंडला 246 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली मात्र ओली पोपसारखी मोठी खेळी एकाही फलंदाजाला खेळता आली नाही. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा 80 आणि 90 धावांवर बाद झाले. मात्र कर्णधार रोहित शर्मा चांगली सुरूवात करू शकला नाही. टीम इंडियाने पहिल्या डावातच 550 किंवा 600 धावा केल्या असत्या तर कदाचित दुसऱ्या डावाची गरजच पडली नसती.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया प्रत्येक षटक आणि प्रत्येक सत्रात पराभवाकडे कूच करताना दिसली. खेळाडूंची देहबोलीही नकारात्मक झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या क्षेत्ररक्षणावर दिसला. मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी काही प्रसंगी चुकीचे क्षेत्ररक्षण केले परंतु सर्वात मोठे नुकसान अक्षर पटेलने केले, ज्याने ओली पोपचा सोपा झेल सोडला. त्यावेळी पोप 110 धावांवर खेळत होता.
IND vs ENG Test इंग्लंडची विजयी सलामी
पहिल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा, शुभमन गिल यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात रोहितने 24 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो 39 धावा करून बाद झाला. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी आणखी निराश झाले. गिल पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात खाते न उघडता तंबूत परतला. त्याचवेळी टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज मानला जाणारा श्रेयस अय्यरही फिरकीपटूंसमोर अपयशी ठरला. पहिल्या डावात 35 धावा केल्यानंतर त्याला दुसऱ्या डावात केवळ 13 धावा करता आल्या. त्याला दोन्ही डावात फिरकी गोलंदाजाने बाद केले.
रोहितने वन डे आणि ट्वेंटी-20 मध्ये कर्णधारपद सिद्ध केले आहे. पण कसोटीतील त्याच्या डावपेचावर नेहमीच प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्याचा प्रत्यय हैदराबाद येथेही पाहायला मिळाला. आपला संघ पराभवाकडे वाटचाल करत असल्याचे दिसताच रोहितसह भारतीय खेळाडूंचे मनोबल खचले. तो खेळाडूंचे मनोबल वाढवताना दिसला नाही.
News Title- IND vs ENG Test England defeated Team India by 28 runs in the first test match, know the main reasons behind India’s defeat
महत्त्वाच्या बातम्या –
iPhone 15: आयफोन 15ची नवी किंमत ऐकून खरेदीसाठी एकच झुंबड, पुन्हा या किंमतीत मिळणार नाही!
INDvsENG | रोहित शर्मा चांगलाच भडकला, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
Shreyas Talpade | ‘या’ कारणामुळे श्रेयसने सर्वांपासून मोठी गोष्ट लपवली!
Ayesha Khan | “त्यांनी मला पहिल्या मजल्यावर नेलं आणि…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार
Bihar Politics | मोठी बातमी! नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ