INDvsENG | पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध (INDvsENG) 28 धावांनी पराभव झाला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती, मात्र ओली पोपच्या दमदार फलंदाजीमुळे सामना टीम इंडियाच्या हातातून निसटला म्हणत रोहितने फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं.
रोहित शर्मा चांगला भडकला
मालिकेतील पहिल्या कसोटीतील निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहितने निराशा व्यक्त करत सांगितलं की, 230 धावांचं लक्ष्य अवघड नव्हतंं पण टीमने ते चुकवलं.
INDvsENG | काय म्हणाला रोहित शर्मा?
कुठे चूक झाली हे शोधणं कठीण आहे. 190 धावांच्या आघाडीसह, आम्ही विजयाच्या जवळ आहोत असं वाटलं, परंतु ऑली पोपने इंग्लंडसाठी चमकदार खेळी खेळली, भारतीय भूमीवर मी परदेशी फलंदाजाकडून क्वचितच सर्वोत्तम खेळी पाहिली असतील, असं सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला होता.
चौथ्या डावात 230 धावा करता आल्या असत्या, खेळपट्टीत तसं काही नव्हतं. आम्ही धावा करण्यात चांगले नव्हतो. मी गोलंदाजीचं विश्लेषण केलं. आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली पण फलंदाजीत आम्ही कमकुवत होतो. सामन्यानंतर तुम्ही विचार करा की काय चांगलं झालं आणि काय नाही. गोलंदाजांनी योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणल्या परंतु पोपची फलंदाजी मजबूत होती. ती एक अप्रतिम खेळी होती, असं रोहितने सांगितलं.
एकूणच एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो. त्यांच्या पहिल्या डावानंतर आणि आमच्या फलंदाजीनंतर आम्हाला वाटलं की आम्ही विजयाच्या जवळ आहोत. इतक्या धावा करण्यात आम्ही चांगले नव्हतो, असं रोहित म्हणालाय.
आम्ही या सामन्यात अनेक चूका केल्या. त्यामुळे आता आगामी सामन्यात आमचे खेळाडू त्या गोष्टी सुधारतील, अशी आशा देखील रोहित शर्मा याने व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Shreyas Talpade | ‘या’ कारणामुळे श्रेयसने सर्वांपासून मोठी गोष्ट लपवली!
Ayesha Khan | “त्यांनी मला पहिल्या मजल्यावर नेलं आणि…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार
Bihar Politics | मोठी बातमी! नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ