Maratha Reservation | मराठा आरक्षणावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे. त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना सरकारने काढली आहे. त्यामुळेच मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एकीकडे मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाला विरोध केला जात आहे.

सरकारच्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. अशात राज्य सरकारने निर्णयाला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील विरोध केल्याचं पाहायला मिळतंय.

सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे.

Maratha Reservation | “मराठा समाजाचं खच्‍चीकरण होईल”

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात सोमवार 29 जानेवारी रोजी मी आपण पत्रकार परिषद घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत, असं ट्विट नारायण राणेंनी केलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वात आधी विरोध केला होता. तसेच ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय.

सरसकट ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला आमचा कायमस्वरूपी विरोध आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावं, त्याला आमचा पाठिंबा आहे, असं पडळकर यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | ‘मनोज जरांगेंची औकात नाही, त्यांची लायकी नाही’; ‘या’ नेत्याचं जरांगेंना आव्हान

जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ketaki Chitale | केतकी चितळे पुन्हा वादात; नेटकरी भडकले, ‘मराठा जातीबद्दल किती द्वेष’

Bihar Politics | ‘…म्हणून मी राजीनामा दिला’; नितीश कुमारांनी सांगितलं खरं कारण

LIC Pension Scheme | ‘…तर महिन्याला मिळेल 20 हजार रुपये पेन्शन’; LIC ची भन्नाट योजना