LIC Pension Scheme | ‘…तर महिन्याला मिळेल 20 हजार रुपये पेन्शन’; LIC ची भन्नाट योजना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LIC Pension Scheme | प्रत्येकाला पेन्शनची (LIC Pension Scheme) चिंता आहे. जोपर्यंत शरीर कामासाठी तंदुरुस्त आहे, तोपर्यंत टेन्शन येत नाही. माणूस कष्ट करून पैसे कमावतो. परंतु जेव्हा शरीर थकतं आणि कामासाठी योग्य नसतं, तेव्हा त्या वेळेसाठी पेन्शन आवश्यक असते. वृद्धापकाळात पेन्शनची सुविधा उपलब्ध झाली तर खायचा खर्च सहज भागवता येतो. लोकांची ही चिंता दूर करण्यासाठी एलआयसी अनेक प्रकारच्या पेन्शन योजना चालवते.

LIC जीवन अक्षय पॉलिसी

एलआयसी विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन देशात अनेक उत्तम योजना चालवत आहे. LIC ला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणारी मोठी लोकसंख्या देशात आहे. हे एक मोठं कारण आहे, ज्यामुळे देशातील अनेक लोक एलआयसीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

तुम्ही LIC ची अशी योजना शोधत असाल, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका फायदेशीर योजनेबद्दल सांगणार आहोत.

LIC Pension Scheme | आयुष्यभर मिळेल पेंशन 

LIC च्या या योजनेचे नाव LIC जीवन अक्षय पॉलिसी आहे. एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल.

तुम्हाला एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये एकदा गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचे मासिक प्रीमियम भरण्याची गरज नाही.

एलआयसीची ही योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकराे खरेदी करू शकता. 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. तुम्ही LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये 40,72,000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केल्यास. अशा परिस्थितीत तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा सुमारे 20 हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

गायक Rahat Fateh Ali Khan यांच्याकडून नोकराला मारहाण, व्हिडीओ तूफान व्हायरल

लाईव्ह सामन्यात Babar Azam चा संयम सुटला; अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला, video viral

PWD Department | नोकरीसाठी जात बदलली! बड्या अधिकाऱ्यांसह 136 जण रडारवर

लेक प्रसिद्धीच्या शिखरावर अन् ‘बापमाणूस’ जमिनीवर; Rinku Singh च्या वडिलांचा भावनिक video

14 वर्षापूर्वी मित्राचं ऐकलं असतं तर आज पश्चात्ताप झाला नसता; Sania Mirza चं मोठं विधान