Nitish Kumar | बिहारच्या राजकारणात आज प्रचंड गदारोळ माजला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश यांनी भाजपला पाठिंब्याचं पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली आहे. त्याआधी नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. यावेळी नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
Nitish Kumar यांचा राजीनामा
नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गेले आहे. यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होत आहे. या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षही आणि एनडीएमधील इतर पक्ष असणार आहे.
Nitish Kumar नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आज नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. नितीश कुमार आजच भाजपसोबत सरकार बनवू शकतात.
भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नीतीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयू-भाजपचे 3-3 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही शपथविधीला उपस्थित राहू शकतात. नड्डा 3 वाजता पाटण्याला पोहोचत आहेत.
आज आपण राजीनामा दिल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं, विद्यमान सरकार रद्द करा, असं आम्ही राज्यपालांना सांगितलंय. सर्व बाजूंनी मतं येत होती. हे आम्ही ऐकलं आहे. आता पूर्वीची युती सोडून नवी युती झाली आहे. आज आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो. आम्ही जे काही काम करत होतो, ते अजिबात काम करत नव्हते. लोकांना अडचणी येत होत्या, असं नितीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
गायक Rahat Fateh Ali Khan यांच्याकडून नोकराला मारहाण, व्हिडीओ तूफान व्हायरल
लाईव्ह सामन्यात Babar Azam चा संयम सुटला; अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला, video viral
PWD Department | नोकरीसाठी जात बदलली! बड्या अधिकाऱ्यांसह 136 जण रडारवर
लेक प्रसिद्धीच्या शिखरावर अन् ‘बापमाणूस’ जमिनीवर; Rinku Singh च्या वडिलांचा भावनिक video
14 वर्षापूर्वी मित्राचं ऐकलं असतं तर आज पश्चात्ताप झाला नसता; Sania Mirza चं मोठं विधान