14 वर्षापूर्वी मित्राचं ऐकलं असतं तर आज पश्चात्ताप झाला नसता; Sania Mirza चं मोठं विधान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sania Mirza | भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे दोघे विभक्त झाले आहेत. 14 वर्षांनंतर शोएबने सानियाशी वेगळे होऊन पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएबचे हे तिसरे लग्न आहे. 2010 मध्ये सानिया आणि शोएब यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा वेगळे होणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होत्या.

शोएब मलिकने सना जावेदसोबतच्या लग्नातील फोटो शेअर करून चर्चांना पूर्णविराम दिला. मिर्झा कुटुंबाकडून अधिकृत विधानाने पाकिस्तानी क्रिकेटरपासून सानिया विभक्त झाल्याची पुष्टी केली. शोएबने तिसरे लग्न केल्यानंतर सानियाने अद्याप उघडपणे भाष्य केले नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय असली तरी याप्रकरणी तिचे मौन कायम आहे.

शोएब मलिकचे तिसरे लग्न

2010 मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती. सानियाला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेले तणावाचे संबंध याला कारणीभूत होते. मात्र, आपले प्रेम मिळवण्यासाठी सानियाने देशाची सीमा ओलांडली, ज्याचा तिला आता पश्चाताप होत आहे.

खरं तर सानियाने शोएबशी लग्न करण्यासाठी सोहराब मिर्झासोबतचे तिचे लग्न मोडले होते. विशेष बाब म्हणजे सानिया आणि सोहराब यांचा साखरपुडा देखील झाला होता. सानियाने सोहराबला नाकारल्यानंतर तिच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तिला हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले होते. पण अनेकांचा विरोध असतानाही सानियाने सल्ल्याविरुद्ध जाऊन शोएब मलिकसोबत लग्न केले.

Sania Mirza चं मोठं विधान

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफने काही धक्कादायक माहिती दिली आहे. हनीफने एका शोदरम्यान खुलासा केला की, शोएबच्या लग्नानंतर त्याने अलीकडेच सानिया मिर्झाशी फोनवरून चर्चा केली. त्याच्या म्हणण्यानुसार सानिया सध्या खूप उद्विग्न असून तिला शोएबच्या या कृत्याचा खूप राग आला आहे. तिला पश्चात्ताप होत आहे.

हनीफने दिलेल्या माहितीनुसार, शोएबशी लग्न करण्याच्या निर्णयावर सानियाने खेद व्यक्त केला होता. सानियाने सांगितले की, 14 वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या लोकांचा सल्ला ऐकायला हवा होता. आता जे झाले आहे ते खूप वाईट आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे होते. मला शोएब मलिकसोबत लग्न करण्यापासून रोखणाऱ्या माझ्या मित्रांचे ऐकायला हवे होते. आज मला त्याच्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होत आहे.

News Title- Pakistani cricketer Shoaib Malik’s ex-wife Sania Mirza reacts after marrying actress Sana Javed
 महत्त्वाच्या बातम्या –

“सरकार पाडण्यासाठी ‘आप’च्या आमदारांना 25 कोटींची ऑफर”, Arvind Kejriwal यांचा गौप्यस्फोट

सेल्फी घेताना तरूणीचा Bobby Deol ला KISS, अभिनेताही अवाक्, video viral

Rohan Bopanna 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता! वयाचा दाखला देत आव्हाडांची विरोधकांवर टीका

Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाही”; नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Gunaratna sadavarte | ‘राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय?’, गुणरत्न सदावर्तेंचा खोचक सवाल