Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाही”; नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitish Kumar | बिहार मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. नितीशकुमार भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नितीशकुमार (Nitish Kumar)  हे रविवारी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

नितीश कुमार (Nitish Kumar) हे भाजपसोबत युती करणार असून पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि नितीश कुमार यांचं सरकार येण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या या बंडाचा लालूप्रसाद यांना तर फटका बसणार आहेच, पण काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

आज संध्याकाळीच नितीशकुमार (Nitish Kumar) हे आपला राजीनामा सोपवणार असल्याचं कळतंय.  नितीशकुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन होत असताना नव्या मंत्रिमंडळात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. सुशीलकुमार मोदी आणि रेणू देवी हे दोघेजण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भाजपची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते. अशात नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्यांनी भाजपवर टीका करताना मोठं वक्तव्य केलं होतं.

Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करेन, पण भाजपसोबत जाणार नाही”

या व्हिडीओत एकवेळ मरण पत्करेन, पण भाजपसोबत जाणार नाही, भाजपसोबत जाणं मान्य नाही, असं म्हणाले होते. पण आता ते पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात भाजप नेते सम्राट चौधरी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संबंधित वक्तव्य केलं होतं. आम्ही एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाहीत, असं नितीश कुमार म्हणाले होते.

नितीश कुमार यांनी 30 जानेवारी 2023 ला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पाटणा येथील गांधी घाटावर भाजपवर सडकून टीका केली होती. आम्ही हिंदू-मुस्लीम सर्वांसाठी काम केलं. माझ्यामुळे मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं, असं देखील नितीश कुमार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

Gunaratna sadavarte | ‘राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय?’, गुणरत्न सदावर्तेंचा खोचक सवाल

Maratha Reservation | ‘…त्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा खुलासा?, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षण अजिबात टिकणार नाही?’, सरकारमधील मंत्र्यानेच बोलून दाखवलं

Maratha Reservation | सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य; छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय