Maratha Reservation | ‘मराठा आरक्षण अजिबात टिकणार नाही?’, सरकारमधील मंत्र्यानेच बोलून दाखवलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | गेल्या कित्येक वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा दिला. आज (27 जानेवारी) मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या (Manoj Jarange) सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

यानंतर राज्यभरात जल्लोष केला जात आहे. जरांगे पाटील यांचे राज्यभरातून कौतुक केलं जात आहे. मात्र दुसरीकडे शिंदे सरकारमधील मंत्र्यानेच मराठा आरक्षणाबाबत एक मोठे वक्तव्य केल्याने खळबळ माजली आहे. मराठा समाजाचा विजय झाला असं सध्या तरी दिसतय,पण मराठा समाजाचा विजय झाला असे मला वाटत नाही, असं वक्तव्य शिंदे सरकारमधील नेत्याने केलं आहे.

“तुम्हाला 50 टक्के मिळण्याची संधी होती, पण…”

झुंडशाही करून नियम आणि कायदे बदलता येत नाहीत. आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून याचा विचार करु तेव्हाच पुढे काय ती कारवाई करू. हे सगेसोयरे (Maratha Reservation) कायद्याच्या कसोटीवर अजितबात टिकणार नाहीत, माझे असे मत आहे, असे शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ म्हणाले (Chhagan Bhujbal ) आहेत.

तसेच, पुढे ते म्हणाले की, मला मराठा समाजाला निदर्शनास आणून द्यायचं आहे की, ओबीसीमधील 17 टक्के आरक्षणात येऊन तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटत आहे. या 17 टक्क्यांमध्ये सगळे लोक येतील. इडब्ल्यूएसच्या आधारे तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळत होतं. ते आता मिळणार नाही. तुम्ही एक मोठी संधी गमावली आहे. तुम्हाला आता खुल्या गटातील आरक्षणही मिळणार नाही. आता 374 जातींसाठी असलेल्या 17 टक्के आरक्षणासाठी तुम्हाला झगडावे लागणार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

तुम्हाला 50 टक्के मिळण्याची संधी होती, पण ती तुम्ही गमावली आहे. असं भुजबळ म्हणाले. 16 फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात येणार आहेत. ओबीसी आणि इतर समाजांमधील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या निर्णयावरील हरकती पाठवाव्यात असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे.

100 रुपयांचं पत्र देऊन जात मिळते काय?

पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी प्रमाणपत्र देण्याबाबतही आक्षेप घेतला. 100 रुपयांचं पत्र देऊ आणि आमची जात (Maratha Reservation) झाली, असं होणार का?, तर असं अजिबात होणार नाही. असे नियम लावले तर, दलितांमध्येही कुणीही घुसतील. त्यामुळे ओबींसींवर अन्याय होत आहे की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागणार आहे, असं भुबजळ यांनी म्हटलं आहे.

तसेच, सरकारी भरतीसाठी मराठा समाजालाच वेगळे नियम का देण्यात येणार?, असं असेल तर मग सगळ्यांनाच मोफत शिक्षण द्या. यासंदर्भात आता भुजबळ उद्या पत्रकार परिषदही घेणार आहेत. आता ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title |  Chhagan Bhujbal on Maratha Reservation

महत्वाच्या बातम्या-  

Maratha reservation GR | ‘…तरच मिळणार कुणबी प्रमाणपत्र’; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Manoj Jarange | मुख्यमंत्र्यांसमोरच मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची लढाई संपली नाही?; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation | जरांगे पाटील यांच्या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

Manoj Jarange | “विजयाचं श्रेय माझ्या मराठा बांधवांचं, भविष्यात अडचणीवेळी पुन्हा उभा राहणार”