Maratha reservation GR | ‘…तरच मिळणार कुणबी प्रमाणपत्र’; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha reservation GR | मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाने मध्यरात्री उशिरा जरांगे यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिंदे सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मान्य केली आहे. सरकारने याबाबत सर्व अध्यादेश जारी (Maratha reservation GR) केले आहेत.

जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

आता या जीआरमध्ये नेमकं काय आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आरक्षणासंदर्भातील जीआर (Maratha reservation GR) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच्यात नेमकं काय आहे, हे सविस्तर खालीलप्रमाणे दिले आहे.

Maratha reservation GR | ‘सगेसोयरे’ म्हणजे नेमके कोण?

शासनाच्या जीआरनुसार (Maratha reservation GR) ‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातींमधील झालेले लग्न आणि त्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा अर्थ असणार आहे.

यांची कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांचे रक्त नात्यातील काका-पुतणे , भाऊ-भावकीतील नातेवाईक असा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे व त्यांचे नातेवाईक अथवा सगळे सोयरे असा याचा अर्थ असेल. अशा अर्जदाराने याबाबतचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास अशा सदस्यांचं शपथपत्र घेऊन महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियमन 2012 नुसार त्यांनाही तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल.

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतील सर्व नागरिकांना वरील अधिनियमाप्रमाणे नोंदणीचा आधार घेऊन जात प्रमाणपत्र देण्यात येईल. मात्र सगळे ‘सगेसोयरे’ याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा मानला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणगोत आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्य अंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे त्या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तसा प्रकारचा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक असेल याची सर्व पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल, असं शासनाच्या जीआरमध्ये लिहिलं आहे.

News Title-  Maratha reservation GR 2024 

महत्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | जरांगे पाटील यांच्या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

Manoj Jarange | “विजयाचं श्रेय माझ्या मराठा बांधवांचं, भविष्यात अडचणीवेळी पुन्हा उभा राहणार”

Sania Mirza | शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची पहिलीच पोस्ट, म्हणाली..

Manoj Jarange | ‘धोका झाला तर…’; मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

Marath Reservation | मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून उपोषण सोडलं