Manoj Jarange | “विजयाचं श्रेय माझ्या मराठा बांधवांचं, भविष्यात अडचणीवेळी पुन्हा उभा राहणार”

Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी कित्येक महिन्यांपासून सरकारशी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मोठं यश मिळालं आहे. शिंदे सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मान्य केली आहे. सरकारने आज (27 जानेवारी) मध्यरात्री याबाबत सर्व अध्यादेश जारी केले आहेत. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

या मोठ्या लढ्याला यश मिळाल्यानंतर मराठा समाजाकडून राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. विजयाचा गुलाल उधळत फटाके फोडण्यात येत आहेत. या लढ्याचे शिलेदार मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत याचं सर्व श्रेय आपल्या मराठा बांधवांना दिलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं श्रेय पूर्णपणे माझ्या समाजाचं आहे. या निर्णयामुळे समाजाचं मोठं काम झालं आहे. आता समाज म्हणून आपला विरोध संपला आहे. समाज म्हणून काम करत असताना आम्ही कोणत्याही पक्षाला सोडलं नाही. आता आपला लढा संपलाय. त्यामुळे समाज म्हणून आपला विरोध आणि विषयदेखील संपलाय. पण भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तर पुन्हा लढणार, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.

आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर याचा विजय जरांगे पाटील मुंबईला आझाद मैदानात साजरा करणार होते, मात्र त्यांनी हा निर्णय मागे घेत मुंबईला जाण्याचं टाळलं आहे. आता ते मुंबईऐवजी थेट आंतरवाली सराटीला जाणार आहेत. आपल्या गावात ते याचा जल्लोष करणार आहेत.

Manoj Jarange यांच्या ‘या’ मागण्या मान्य

  1. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या असून त्यांना प्रमाणपत्र तातडीने देण्यात येणार आहे.
  2. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही जातप्रमाणपत्र देण्यात येणार.
  3. आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे लावण्यात आले होते, हे सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार
  4. मराठा समाजाची वंशावळी जोडण्याकरता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली असून यासाठी 1884 सालच्या मराठ्यांचा गॅझेटचा विचार केला जाणार आहे.
  5. मराठवाडामधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडण्यासाठी शिंदे समितीला मुतदवाढ देण्यात येणार आहे.
  6. शिक्षणामध्ये मराठ्यांना ओबीसीप्रमाणे सवलत मिळणार आहे.
  7. या सर्व आदेशांचे आगामी अधिवेशनात कायद्यात रूपांतर केले जाईल.

News Title- Manoj Jarange reaction after Maratha reservation accepted

महत्त्वाच्या बातम्या- 

Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातील ‘या’ सात शिलेदारांचा होणार सर्वोच्च सन्मान

Manoj Jarange Patil | सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, जाणून घ्या मनोज जरांगेंची नेमकी मागणी काय?

Abhishek Bachchan | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पोस्ट, म्हणाला..

Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याने केलं मोठं वक्तव्य!