Manoj Jarange Patil | सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, जाणून घ्या मनोज जरांगेंची नेमकी मागणी काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा समाजातील आरक्षणासंदर्भात शासनाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यातील महत्वाची मागणी म्हणजे सगेसोयरे संबंधातली. सोयऱ्यांची मागणी मान्य झाली आहे. त्याचा अध्यादेश आज रात्रीतून निघणार आहे. तोपर्यंत नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील राहणार आहेत.

सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?

सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या व्याख्यात आईकडील नातेवाईकांचाही समावेश करावा अशी मागणी केली आहे. एकाच जातीत लग्न झालं असेल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil | जरांगेंची नेमकी मागणी काय?

सरकारी भरतीमध्ये मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा आणि सगेसोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या अशा मागण्या मनोज जरागे (Manoj Jarange Patil) यांनी केल्या आणि त्यासंबंधी उद्या सकाळपर्यंत सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी केली आहे.

सग्यासोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहणार नाही. शपथपत्रावर सग्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांचा मेसेज मनोज जरांगे पाटील यांनी सभेत वाचून दाखवला. त्यात म्हटलंय आहे की, ”सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सही झाली आहे.

आझाद मैदानाचा निर्णय उद्या सर्वांनी बसून घ्यायचा आहे. तुमच्याशिवाय निर्णय घ्यायच नाही. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Abhishek Bachchan | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पोस्ट, म्हणाला..

Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याने केलं मोठं वक्तव्य!

Maratha Reservation | मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ‘या’ मागण्या सरकारकडून मान्य

Manoj Jarange Patil: वाशीच्या भाषणात काय ठरलं?, सर्व मुद्दे व्यवस्थित समजून घ्या आणि इतरांना सुद्धा पाठवा