Maratha Reservation | मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ‘या’ मागण्या सरकारकडून मान्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पायीदिंडी घेऊन मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. शिंदे सरकारने जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी मराठा आरक्षण संबंधी (Maratha Reservation) केलेल्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत.

त्यामुळे जरांगे पाटील यांनी सध्या तरी आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच त्यांच्या हातात असणार आहे. जर उद्या दुपारपर्यंत आम्हाला अध्यादेश मिळाला नाही, तर आम्ही मुंबईतच येणार. त्यामुळे सगेसोयऱ्यांचा अध्यादेश अगोदर काढा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

सरकारने ‘या’ मागण्या मान्य केल्या

  • मराठा समाजातील (Maratha Reservation) नोंदी मिळालेल्या सर्व कुटुंबाच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळणार. अर्थातच एका नोंदीवर पाच नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. परंतु नोंदी मिळालेल्या परिवाराने प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. आतापर्यंत 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत. तसेच आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
  • शिंदे समिति रद्द केली जाणार नाही. ही समिती अजूनही कार्यरत असणार आहे.
  • मराठा समाजातील (Maratha Reservation) ज्या नागरिकांकडे नोंदी नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र दिले जाईल.
  • जालनामधील आंतरवाली येथे झालेल्या आंदोलनात ज्या नागरिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, ते सर्व मागे घेतली जातील. तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जे गुन्हे दखल झाले ते देखील मागे घेतले जातील.
  • तसेच, सरकारी भरती आरक्षण मिळेपर्यंत केली जाणार नाही. यासोबतच शासकीय भरती केल्या तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेऊनच भरती केली जाईल. ही मागणी देखील मान्य करण्यात आली.

मनोज जरांगे यांचा इशारा

दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन तूर्तास मागे घेतले असून सरकारला त्यांनी इशाराही दिला आहे. प्रजासत्ताक दिनाचा मान ठेवून मी आझाद मैदानावर जाणार नाही. आजची रात्र इथंच काढतो, पण आज रात्रीपर्यंत अध्यादेश (Maratha Reservation) इथं आणून द्या. रात्रभर अध्यादेशाचा अभ्यास करु, त्यामध्ये काही खोटंनाटं असेल तर त्याचा किस पाडू. हवं तर आझाद मैदानाऐवजी वाशीतच थांबतो पण अध्यादेश दिला नाहीतर मी आझाद मैदानावर जाणार, असं आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलंय.

News Title :  Maratha Reservation related demands accepted

महत्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange Patil: वाशीच्या भाषणात काय ठरलं?, सर्व मुद्दे व्यवस्थित समजून घ्या आणि इतरांना सुद्धा पाठवा

Manoj Jarange Patil: …तर मी आझाद मैदानावर जाणार- मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची आणखी एक मोठी मागणी!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय अखेर जाहीर

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठी घोषणा!