Manoj Jarange Patil: …तर मी आझाद मैदानावर जाणार- मनोज जरांगे पाटील

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | सरकारने दिलेला जीआर मनोज जरांगे यांनी वाचून मराठा समाजाच्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते लाखो मराठा बांधवांच्या समोर आले. त्यांनी सर्वांसमोर सरकारचा जीआर वाचून दाखवला. यावेळी त्यांनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली.

…तर मी आझाद मैदानावर जाणार- मनोज जरांगे

प्रजासत्ताक दिनाचा मान ठेवून मी आझाद मैदानावर जाणार नाही. आजची रात्र इथंच काढतो, पण आज रात्रीपर्यंत अध्यादेश इथं आणून द्या. रात्रभर अध्यादेशाचा अभ्यास करु, त्यामध्ये काही खोटंनाटं असेल तर त्याचा किस पाडू. हवं तर आझाद मैदानाऐवजी वाशीतच थांबतो पण अध्यादेश दिला नाहीतर मी आझाद मैदानावर जाणार. , असं आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलंय.

या सगळ्या मागण्यांचा अध्यादेश काढा. मी शब्द देतो की एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. आज रात्रीपर्यंत आम्हाला हा अध्यादेश द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली आहे. तसेच आम्हाला मंबईत यायची हौस नव्हती, असंही जरांगेंनी म्हटलं.

सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढा. जर उद्या दुपारपर्यंत आम्हाला अध्यादेश मिळाला नाही, तर आम्ही मुंबईतच येणार. त्यामुळे सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज काढा, असं आव्हान मनोज जरांगे यांनी सरकारला केलं आहे.

आंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे… गृह विभागाने विहीत प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू केलीय. मात्र त्याचं पत्र नाहीये, हे पत्र देण्याची आमची मागणी आहे, असं जरांगेंनी म्हटलंय.

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी सरकारकडे पुढील मागण्या केल्या-

नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या
शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या
कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा
जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा
आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या
SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या
वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या
रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आजची रात्र नवी मुंबईत काढतो

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची आणखी एक मोठी मागणी!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय अखेर जाहीर

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठी घोषणा!

Manoj Jarange Patil | आझाद मैदानावर जाण्यावर मनोज जरांगे ठाम; सर्वांना सरकारचा जीआर वाचून दाखवणार

Manoj Jarange | “झोपेत असताना पोलिसांनी..”; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप