Manoj Jarange | “झोपेत असताना पोलिसांनी..”; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. प्रजासत्ताक दिनी मराठ्यांचं भगवं वादळ आज (26 जानेवारी) मुंबईच्या आझाद मैदानावर दखल होत आहे. त्यापुर्वीच जरांगे पाटील यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

“लोणावळ्यात झोपेत असताना माझ्याकडे कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझ्याकडून सही करून घेतली. आम्ही कोर्टाचा मान ठेवतो, म्हणून मी सही केली. यामध्ये एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता”, असा खुलासा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )यांनी केला आहे.

यानंतर जरांगे पाटील यांनी थेट इशाराच दिला आहे. ‘माझ्यासोबतच इतर नऊ जण असल्याचं सांगत मला फसवून सही घेण्यात आली आहे. पण, याचा दुरुपयोग कुणी केला तर लक्षात ठेवा त्यांची गाठ माझ्याशीच आहे.’, असा रोखठोक इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज शिंदे सरकारच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.

मराठा आंदोलक आंदोलनसाठी आझाद मैदानाकडे निघाले आहेत. हळूहळू समाज एकत्र होत असल्याचे दिसते आहे. या मोर्चासाठी कोर्टाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, तरी जरांगे पाटील आपल्या मोर्चावर ठाम असल्याने पोलिसांची मोठी अडचण वाढली आहे.

मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना

नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलणासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मोर्चेकरांसाठी तीन हजार किलोंचा मसाले भट तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच 25 हजार पोळ्या घराघरातून जमा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आपल्या मोर्चेवर ठाम असल्याचे यातून दिसून येते.

मनोज जरांगेंशी (Manoj Jarange )चर्चा करण्यासाठी शिंदे सरकार पावले उललत असतानाच राज्यपाल रमेश बैस यांनीही मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांचे आंदोलनासंबंधित विधान आता चर्चेत आले आहे. ‘राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये क्यूरेटिव पिटीशन दाखल केली असून शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत.

News Title : Manoj Jarange Serious accusation

महत्वाच्या बातम्या- 

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान, ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!

Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’