Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bollywood Actress | बॉलिवूड कलाकार परदेशात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात. तेथील जीवनशैली, पर्यटन अन् चित्रपटांसाठी असलेले वातावरण अनेक कलाकारांसह दिग्दर्शकांना भुरळ घालते. अशातच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनला यूएई सरकारने मोठी भेट दिली आहे. कारण क्रिती सनॉनला यूएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. शाहरुख खाननंतर क्रितीला हा व्हिसा मिळाला. याआधी देखील अनेक बॉलिवूड स्टार्सना हा व्हिसा देण्यात आला आहे.

खरं तर 2019 मध्ये क्रिती सनॉनच्या गोल्डन व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर आता हा व्हिसा क्रिती सनॉनकडे सोपवण्यात आला आहे. हा व्हिसा मिळाल्यानंतर लोक यूएईत अभ्यास, व्यवसाय आणि दीर्घकाळ राहण्याची योजना करू शकतात. एकूणच यूएईत वास्तव्य करण्यासाठी गोल्डन व्हिसा फार महत्त्वाचा आहे.

यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

क्रितीच्या आधी अनेक बॉलिवूड कलाकारांना गोल्डन व्हिसा मिळाला आहे. यापूर्वी यूएई सरकारने शाहरुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग, कमल हसन, मोहनलाल, दुल्कर सलमान, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, फराह खान, सोनू सूद यांना हा व्हिसा दिला आहे.

अभिनेत्री क्रिती सनॉन बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. तिने मागील 10 वर्षात तिचे खास स्थान गाठले आहे. साऊथ चित्रपटसृष्टीपासून सुरू झालेला क्रिती सनॉनचा हा प्रवास सध्या जोरात सुरू आहे. मागील वर्षी क्रिती सनॉनला तिच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

Kriti Sanon ला मिळाला गोल्डन व्हिसा

क्रिती सनॉनला गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना अभिनेत्री म्हणाली की, यूएईचा गोल्डन व्हिसा मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. दुबईला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि मी तेथील अप्रतिम संस्कृतीचा आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.

क्रिती अमित जोशी आणि आराधना साह यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती शाहिदसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या चित्रपटात ती रोबोटची भूमिका साकारत आहे. फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

News Title – Bollywood Actress Kriti Sanon has been granted a golden visa by the UAE government
महत्त्वाच्या बातम्या –

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार

Bihar Politics | बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी! नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर

Republic Day | सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; कर्तव्य पथावर ‘नारी शक्ती’ची झलक, जाणून घ्या!