Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे. तब्बल 500 वर्षांनतर रामलला भव्य मंदिरात विराजमान झाले अन् देशभरात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. देशभरातील विविध शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान, रामललाच्या मूर्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रामलला डोळे मिचकावताना दिसत आहे.

खरं तर 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक ठरला आहे. तसेच अयोध्येतील नवे राम मंदिर या दिवपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी अडीच ते तीन लाखांहून अधिक भाविकांनी रामललाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

रामललाची 51 इंचाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अशातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेला एक व्हिडीओ रामभक्तांना भुरळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रामलला डोळ्यांची उघडझाप करतात. तसेच डोळे मिचकावत असल्याचे पाहून प्रत्यक्षात रामलला असल्याचा भास होतो.

रामललाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. राम मंदिराची उभारणी सर्वसामान्यांच्या देणगीतून करण्यात आली आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी मोठी रक्कम दान केली.

राम मंदिराच्या बांधकामादरम्यान ट्रस्टने 2022 मध्ये 45 दिवसांची निधी समर्पण मोहीम चालवली होती. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले की, या मोहिमेत भाविकांकडून 10, 100 आणि 1000 रुपयांच्या पावत्यांद्वारे निधी गोळा करण्यात आला. देशातील सुमारे 13 कोटी कुटुंबांनी हा निधी समर्पित केला होता. त्यावेळी 3500 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.

 

Ram Mandir भव्य कार्यक्रमासाठी दिग्गजांची हजरी

उद्योग क्षेत्रातील दिग्गज मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल यांच्यासह २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. बॉलिवूड कलाकार देखीया या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू तसेच रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजासोबत दिसला होता.

खरं तर मुकेश अंबानी यांनी दोन कोटींहून अधिक रूपयांची देणगी राम मंदिरासाठी दिली आहे. हिरे व्यापारी दिलीप कुमार लाखी यांनी 101 किलो सोने दान केले आहे. त्याची किंमत अंदाजे 68 कोटी रुपये आहे. या सोन्याचा वापर दरवाजा, त्रिशूळ आणि डमरूमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सुरतचे व्यापारी मुकेश पटेल यांनी 11 कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट भेट दिला आहे.

News Title- Ram Mandir artificial intelligence made video is going viral
महत्त्वाच्या बातम्या –

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार

Bihar Politics | बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी! नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर