Virat Kohli | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली मागील एका दशकापासून प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विराट कोहलीची मैदानातील एन्ट्री पाहण्यासाठी त्याचे कोट्यवधी चाहते आतुर असतात. विराटनेही आपल्या चाहत्यांना नाराज न करताना सातत्याने प्रभावी कामगिरी केली. किंग कोहलीच्या नावावर विराट (Virat Kohli ICC Awards Tally) विक्रमांची नोंद आहे, त्यात आयसीसीने आणखी भर घातली आहे. विराट कोहली जगातील कोणत्या स्तरावर आहे याचा अंदाज त्याच्या ICC पुरस्कारांच्या यादीवरून लावला जाऊ शकतो.
किंग कोहली ‘सुसाट’
विराट कोहली सर्वाधिकवेळा ICC चा पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 2012 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी पहिल्यांदा ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब जिंकला होता. आता विराटने वयाच्या 35 व्या वर्षी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. विराटच्या खात्यात एकूण 10 आयसीसी पुरस्कार जमा झाले आहेत.
इतकेच नाही तर कोहलीच्या नावावर एकूण 5 BCCI पुरस्कार, 3 ICC प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार आणि 12 ICC प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारांची नोंद आहे. वन डेमध्ये विराट कोहलीची तुलना इतर कोणाशीच होऊ शकत नाही. तो वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक आयसीसी पुरस्कार पटकावणारा खेळाडू ठरला आहे. रन मशीनने 2012, 2017, 2018 आणि 2023 मध्ये हा पुरस्कार जिंकला.
Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान
सर्वांच्या लाडक्या किंग कोहलीने 2017 आणि 2018 मध्ये ICC क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. तसेच 2018 मध्ये विराटला ICC टेस्ट प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता. विराट कोहलीने 2019 मध्ये आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार पटकावला. 2020 मध्ये विराटला दशकातील सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला.
2010 ते 2019 दरम्यान दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कारही विराटच्या नावावर राहिला. विराट कोहली 10 पुरस्कारांसह सर्वाधिक ICC पुरस्कारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा आणि महेंद्रसिंग धोनी आहे, ज्यांच्या नावावर 4-4 आयसीसी पुरस्कार आहेत.
𝗜𝗖𝗖 𝗠𝗲𝗻’𝘀 𝗢𝗗𝗜 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗬𝗲𝗮𝗿 𝟮𝟬𝟮𝟯
It goes to none other than Virat Kohli! 👑🫡
Congratulations 👏👏#TeamIndia | @imVkohli pic.twitter.com/1mfzNwRfrH
— BCCI (@BCCI) January 25, 2024
विराटच्या ICC पुरस्कारांची यादी
2012 – ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर
2017 – ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर
2017 – ICC क्रिकेटर ऑफ द इयर
2018 – ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर
2018 – ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर
2018 – ICC क्रिकेटर ऑफ द इयर
2019 – ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट
2020 – ICC ODI क्रिकेटर ऑफ द ‘दशक’ (decade)
2020 – दशकातील ICC क्रिकेटर
2023 – ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर
News Title – Virat Kohli wins ICC Men’s ODI Cricketer of the Year award He becomes the first player in the world to win the ICC Men’s ODI Cricketer of the Year award, with 10 ICC awards to his name
महत्त्वाच्या बातम्या –
Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार
Bihar Politics | बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी! नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर
Republic Day | सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; कर्तव्य पथावर ‘नारी शक्ती’ची झलक, जाणून घ्या!
Salman Khan | सलमानने शब्द पाळला! ‘त्या’ मुलीला दिलेलं वचन केलं पूर्ण
Parineeti Chopra | लग्नानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने घेतला मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली…