Bihar Politics | बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी! नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bihar Politics | बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचे संकेत खुद्द नितीश यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या मागील वर्षी डिसेंबरपर्यंत अनेक बैठका झाल्या. निवडणुकीच्या वर्षात ही आघाडी आणखी मजबूत होईल असे वाटत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला.

आता बिहारमधून देखील ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे. कारण लालू यादव यांच्या आरजेडी आणि जदयूमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने बिहारमध्ये प्रवेश केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी होणार असल्याची चर्चा होती, ती त्यांच्याच पक्षाने फेटाळून लावली. यानंतर वाद चव्हाट्यावर आला.

बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी

बिहारमध्ये सुरू असलेल्या सर्व राजकीय पेचप्रसंगामुळे बिहारमध्ये काही मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा जोर धरू लागली आहे. राहुल यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी न होणारे नितीश कुमार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 4 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे कळते. ऐन थंडीच्या दिवसात बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपच्या रॅलीत सहभागी झाल्याच्या बातमीने अटकळ आणखी वाढली आहे. 4 फेब्रुवारीला सुगौली, बेतिया येथे होणाऱ्या मोदींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार देखील सहभागी होणार आहेत. बिहारमधील भाजपचे नेते वरिष्ठांशी दिल्लीत भेट घेत आहेत. सर्व राजकीय गदारोळात गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून नितीश कुमारही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेत आहेत.

Bihar Politics नितीश कुमार यांचे धक्कातंत्र कायम?

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी हेही दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानी नितीश कुमार यांनी माजी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह, मंत्री विजय चौधरी, संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. विशेष म्हणजे जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी हे देखील भाजपचे चौधरी ज्या विमानाने गेले त्याच विमानाने दिल्लीला रवाना झाले.

दरम्यान, नितीश कुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्रीपद सांभाळत आहेत. भाजपसोबत खटकल्यानंतर त्यांनी लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून नवीन सरकार स्थापन केले. त्यांच्या सरकारमध्ये लालू यादवांचा लहान मुलगा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहे. ‘इंडिया’ आघाडी करण्यात पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमार यांच्या या हालचालींमुळे राजकीय पंडितांनाही धक्का बसला.

News Title- many dramatic events happening in Bihar and Chief Minister Nitish Kumar will go with BJP
 महत्त्वाच्या बातम्या –

Salman Khan | सलमानने शब्द पाळला! ‘त्या’ मुलीला दिलेलं वचन केलं पूर्ण

Parineeti Chopra | लग्नानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने घेतला मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली…

Mary Kom | मेरी कॉमच्या घोषणेनं देशभरात खळबळ, अखेर स्वतःच पुढे येऊन केला मोठा खुलासा !

Anil Kapoor | ..अन् प्रसिद्ध अभिनेता ढसाढसाच रडला; त्या कार्यक्रमात असं नेमकं काय घडलं?

Bigg Boss 17 | कोण ठरणार ‘बिग बॉस’चा विजेता?, ‘या’ दोन स्पर्धकांमध्ये होणार फिनालेसाठी चुरस!