Parineeti Chopra | लग्नानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने घेतला मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Parineeti Chopra | बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) ‘आप’चे नेते राघव चड्ढासोबत संसार थाटला आहे. हे जोडपे आपले सुखी आयुष्य जगत आहेत. इश्कजादे, केसरी, मेरी प्यारी बिंदु, चमकीला, मिशन रंगरेज या सुपरहीट चित्रपटात काम करून परिणीतीने आपल्या अभिनयाची झलक दाखवलीच आहे. मात्र, लग्नानंतर ती एकाही चित्रपटात दिसून आली नाही.

आता परिणीतीने आपल्या करीअरबाबत मोठा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. राघव चड्ढासोबत लग्न केल्यानंतर ती राजकारणात जाणार, असे म्हटले जात होते. मात्र, या सर्व चर्चा तिने फेटाळून लावत मोठी घोषणा केली आहे. परिणीतीने सोशल मिडिया पोस्ट करत आपला निर्णय जाहीर केला आहे.

Parineeti Chopra ने केली मोठी घोषणा

“संगीत हे माझ्यासाठी नेहमीच आनंदाचे ठिकाण राहिले आहे. मी जगभरातील असंख्य संगीतकारांना रंगमंचावर सादरीकरण करताना पाहिले आहे आणि आता त्या जगाचा भाग होण्याची माझी वेळ आली आहे.”, अशा आशयाची पोस्ट परिणीतीने (Parineeti Chopra) केली आहे. त्यामुळे परी आता अॅक्टिंगनंतर संगीत क्षेत्रात आपले नशीब अजमावणार आहे.

माझ्या आयुष्यातील हा संपूर्ण नवीन अध्याय सुरू केल्यामुळे मी प्रचंड आनंदित आहे. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. या संगीतमय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी मी किती उत्साहित आहे याचे मी वर्णन करू शकत नाही. मला एकाच वेळी दोन करिअर करण्याची संधी देणारा हा प्रवास आहे. असे परिणीतीने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

परिणीतीच्या या पोस्टनंतर तिला चाहत्यांचकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मनीष मल्होत्राने देखील तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लग जा गले’ हे गाणे परिणीतीने खूपच सुंदर गायले आहे, असे म्हणत एका चाहत्याने तिला शुभेच्छा दिल्या.

परिणीतीने केला मोठा करार

परिणीतीने (Parineeti Chopra) आपल्या संगीत प्रवासाची सुरुवात एका करारापासून केली आहे. परिणीतीने Ventures Pvt Ltd आणि देशातील लोकप्रिय गायकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या TM टॅलेंट मॅनेजमेंटशी करार केला आहे. इंडस्ट्रीमधील आघाडीचे गायक अरिजित सिंग, सुनिधी चौहान, बादशाह, अमित त्रिवेदी यांच्यासह 25 हून अधिक कलाकार या कंपनीशी संबंधित आहेत.

परिणीतीने गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये ‘आप’ नेते राघव चड्ढा यांच्याशी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले होते.लग्नाच्या काही महिन्यांनीच तिने फिल्मी दुनियेऐवजी संगीत दुनिया निवडली आहे. आता परिणीती चित्रपटांऐवजी संगीत क्षेत्रात आपली छाप पाडणार आहे. तिच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

News Title : Parineeti Chopra new career in music

महत्त्वाच्या बातम्या-

Sania Mirza: “मला माहीत नाही मी तिच्यामध्ये…”; सानियासोबतच्या लग्नाबद्दल Shoaib Malikचा धक्कादायक खुलासा

Manoj Jarange Patil: मराठ्यांनो सावध व्हा… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो मेसेज खोटा!

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर