Manoj Jarange Patil: मराठ्यांनो सावध व्हा… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो मेसेज खोटा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha News | मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) शेवटचा आणि महत्त्वाचा लढा पुकारला आहे. आंतरवाली सराटीमधून सुरु झालेलं जरांगे पाटलांचं आंदोलन आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, असा नारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुंबईच्या दिशेने सरकत असलेलं हे आंदोलन सध्या लोणावळ्यात पोहोचलं आहे.

मराठा आंदोलनाचं वादळ मुंबईच्या दिशेने सरकत असताना सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच प्रकारचे मेसेज व्हायरल व्हायला लागले आहेत. मुंबईच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या तसेच निघण्याच्या बेतात असलेल्या मराठा समाजाच्या लोकांसाठी हे मेसेज परिणाम करणारे ठरत आहेत. हे मेसेज वाचून अनेक लोक आंदोलनाला जाण्याचा बेत रद्द करताना दिसत आहेत, मात्र मराठा समाजाने सावध होण्याची गरज आहे, कारण सोशल मीडियात व्हायरल होणारे हे मेसेज धादांत खोटे आहेत.

नेमक्या काय प्रकारचे मेसेज व्हायरल-

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मुंबईत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यांनी यासाठी थेट आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेनं आगेकूच केली, वाटेत त्यांना लाखो मराठे येऊन मिळाले. पुण्यापासून लाखोंचा जनसागर आता मुंबईच्या दिशेनं सरकतोय. जरांगे पाटील यांना मिळणारा पाठिंबा पाहून सरकार सुद्धा टेन्शनमध्ये आलं आहे.

मोर्चाच्या या ऐन मोक्याच्या वेळीच सोशल मीडियावर चुकीचे मेसेज प्रसारित केले जात आहे. लोणावळ्यातच निर्णय होणार आहे, मराठ्यांनो गुलाल उधळा, लोणावळ्यातून जरांगे पाटील माघारी फिरणार आहेत, सरकारने मराठा आरक्षण दिलं असून जरांगे पाटील यांनी आंदोलन मागं घेतलं आहे, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

Manoj Jarange Patil यांचा अद्याप निर्णय नाही

वास्तविक पाहता मराठा आरक्षणाबाबत अद्याप सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलन मागे घेतलेलं नाही. नुकत्याच झालेल्या लोणावळ्याच्या सभेत त्यांनी मुंबईला जाण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

लोणावळ्यात सुद्धा सरकारचे शिष्टमंडळ आले, त्यांच्यासोबत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) चर्चा करणार आहे, त्यानंतर उपस्थितांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. मात्र सध्या तरी मनोज जरांगे पाटील लोाणावळ्यातूनच माघारी फिरणार यासारख्या मेसेजला दुजोरा देईल, अशी माहिती समोर आलेली नाही. काही खोडसाळ लोकांकडून असे मेसेज व्हायरल केले असण्याची शक्यता आहे, जेणेकरुन मराठा समाजाच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता