Sanjay Raut | ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत यांना नोटीस बजावली आहे. कोरोना काळात ‘खिचडी घोटाळ्या’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने सांगितले की, संदीप राऊत यांना पुढील आठवड्यात केंद्रीय एजन्सीच्या मुंबई कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत त्यांचे बयान नोंदवले जाईल.
या प्रकरणी मागील आठवड्यात ईडीने ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (UBT) युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य चव्हाण हे गुरुवारपर्यंत ईडीच्या कोठडीत असणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) केलेल्या एफआयआरमधून मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले आहे.
संदीप राऊत हाजीर हो
तपास एजन्सीने सांगितले की, खिचडीच्या पॅकेटच्या पुरवठ्यासाठी बीएमसीने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसच्या बँक खात्यात 8.64 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती. ज्यात ‘खिचडी’चा करार झाला होता. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राट देताना अनियमितता झाली होती. यावरूनच ईडीकडून तत्कालीन सत्ताधारी ठाकरे गटातील नेत्यांसह त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.
संदीप राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. ईडीने संदीप राऊत यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बीएमसीच्या खिचडीच्या कंत्राटात अनियमितता केल्याचा आरोप करून दाखल केलेल्या खटल्यावर आधारित आहे.
Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस;
राज्यसभा खासदार संजय राऊत आणि सत्ताधारी भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राऊत रोज नवनवीन आरोप करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एकिकडे संजय राऊतांचे लहान भाऊ संदीप राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली तर दुसरीकडे ईडीने आमदार रोहित पवारांची जवळपास 11 तास चौकशी केली.
दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी केली. समन्स बजावल्यानंतर रोहित पवार बुधवारी सकाळी दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील एजन्सीच्या कार्यालयात हजर झाले. रात्री दहाच्या सुमारास चौकशी केल्यानंतर बाहेर आलेले पवार म्हणाले की, आपण एजन्सीला सहकार्य करत असून, 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
News Title- ED has sent a notice to Sandeep Raut, younger brother of Shiv Sena Thackeray group MP Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या –
ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता
IND vs ENG | विराटच्या जागी युवा खेळाडूला संधी; रहाणे-पुजारा यांना पुन्हा एकदा वगळलं
मुख्यमंत्री Eknath Shinde शेतीत रमले; हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग, पाहा फोटो
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का, गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचे मोठे आदेश