IND vs ENG | आजपासून भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध (IND vs ENG Test) पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहलीची रिप्लेसमेंट जाहीर करण्यात आली आहे. किंग कोहलीने वैयक्तिक कारणास्तव दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. विराट कोहलीची जागा घेण्याच्या शर्यतीत सर्फराज खानचे नाव आघाडीवर होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने विराटच्या आयपीएल संघातील सहकारी खेळाडूवर विश्वास दाखवला.
विराटच्या जागी युवा खेळाडूला संधी
विराट कोहलीच्या जागी युवा रजत पाटीदारची वर्णी लागली आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे. रजत पाटीदार पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी हैदराबादमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. खरं तर रजत पाटीदारला त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाल्याचे दिसते. तर, सर्फराज खानला पुन्हा एकदा भारतीय संघाच्या तिकिटापासून दूर राहावे लागले.
भारत अ संघाकडून खेळताना रजत पाटीदारने इंग्लंड लायन्सविरुद्ध 151 धावांची खेळी केली. मागील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही रजत पाटीदारने भारत अ संघाकडून 111 धावांची खेळी केली होती. त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे रजत पाटीदारला टीम इंडियात एन्ट्री मिळाली आहे. युवा खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचे पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
IND vs ENG आजपासून थरार
विराटच्या अनुपस्थितीत अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यांना संधी मिळेल असे अपेक्षित होते. मात्र, रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे. याबद्दल रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले की, अनुभवी चेहऱ्याला संधी द्यावी असा विचार होता, पण मग युवा खेळाडूंना संधी कधी देणार असाही प्रश्न मनात आला. त्यामुळे रजतला खेळवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनुभवी खेळाडूंचा परतीचा मार्ग बंद असे काही होत नाही. ते चांगली कामगिरी करून संघात परतू शकतात. आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेला सुरूवात होत असून, सलामीचा सामना हैदराबाद येथे खेळवला जात आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, जेक लीच आणि मार्क वुड.
पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आवेश खान.
News Title- Rajat Patidar, not Cheteshwar Pujara or Ajinkya Rahane, has been given the chance as Virat Kohli’s replacement for the first two Tests against England
महत्त्वाच्या बातम्या –
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का, गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचे मोठे आदेश
Kangana Ranaut | ‘ड्रामा क्वीन’ नेमकं कुणाला डेट करतेय?, अयोध्येतील फोटोमुळे चर्चांना उधाण
Mira road | मीरारोड परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!
Manoj Jarange | आझाद मैदानात फक्त एवढ्याच लोकांना परवानगी; हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश