मुख्यमंत्री Eknath Shinde शेतीत रमले; हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग, पाहा फोटो

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी आहेत. दरे गावात आपल्या सहकाऱ्यांसोबत शेतीकाम करतानाचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. हातात कुदळ, ट्रॅक्टरचे स्टेअरिंग आणि शेतात राबताना शिंदे दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे शिंदेंचे मूळ गाव आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या गावात बऱ्यापैकी भाताची शेती केली जाते. पण, आता शिंदे हळदीचे पिक काढताना दिसले.

दरे गावातील उत्तरेश्वर यात्रा प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. गावी गेले असता त्यांनी शेतीकडे फेरफटका मारला. हातात रोटर घेऊन त्यांनी शेतातील कामे देखील केल्याचे त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळते. एकिकडे शिंदे शेतीत रमले असताना मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.

मुख्यमंत्री शेतीत रमले

दरे गावात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काम करत आहे. राज्य सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन थांबवावे. सरकार काम करत नसेल तर आंदोलन केले असते तर गोष्ट वेगळी असती. पण हे सरकार मराठा समाजाच्या हितासाठी काम करत आहे.

 

एकनाथ शिंदेंनी शेतीत काम करतानाचे फोटो शेअर करताना म्हटले, “हे एक झाड आहे याचे माझे नाते… वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते… मला आवडतो याच्या फुलांचा वास… वासामधुनी उमटणारे जाणीव ओले भास… सुप्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या ओळी माझ्या गावाच्या मातीत रमल्यावर माझ्या ओठी येतात, कारण गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात यात्रेनिमित्त आलो असता पुन्हा एकदा शेती आणि मातीत रमलो. यावेळी शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळाला.”

Eknath Shinde साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी

तसेच शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गावाकडची माणसं यांच्याशी असलेले नाते याचे आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. त्यामुळेच या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे शिंदेंनी नमूद केले.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे गावी शेतीतील कामांशिवाय गायींसोबत रमल्याचेही दिसले. ते गायीला चारा भरवताना दिसले. मुख्यमंत्री त्यांच्या गावातील सहकाऱ्यांसोबत हळदीची काढणी करत आहेत. हळद काढण्यासाठी जमिनीलगत असलेल्या पिकाला धारदार विळ्याने कापून घ्यावे लागते. यासाठी शिंदेंनी कुदळीच्या साहाय्याने हळद काढली.

News Title- Chief Minister Eknath Shinde has shared photos of him working in the fields in his native village Dare in Satara
 महत्त्वाच्या बातम्या –

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का, गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचे मोठे आदेश

Narendra Modi | “…तरी नरेंद्र मोदी जिवंत राहिले असतील तर मग तो चमत्कारच”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Kangana Ranaut | ‘ड्रामा क्वीन’ नेमकं कुणाला डेट करतेय?, अयोध्येतील फोटोमुळे चर्चांना उधाण

Mira road | मीरारोड परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

Manoj Jarange | आझाद मैदानात फक्त एवढ्याच लोकांना परवानगी; हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश