Manoj Jarange | आझाद मैदानात फक्त एवढ्याच लोकांना परवानगी; हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र एक करत आंदोलन करत आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी 35 उपोषणं देखील केली आहेत. वारंवार सरकारला सांगत यावर ठोस भूमिका घेत नसल्यामुळे जरांगे पाटील आता थेट महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबई येथे जाऊन आमरण उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील हे पायी पायी मुंबईला रवाना होणार आहे. येत्या 2 दिवसात जरांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईला पोहचणार आहेत. मात्र, जरांगे पाटील यांना हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा आदेश आला आहे.

काय आहे आदेश?

मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मात्र जरांगे पाटील यांना हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा आदेश आला आहे. यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

“सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी”, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. शिवाय आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील यावेळी कळवण्यात यावे”, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गुणरत्न सदावर्तेंनी केली याचिका दाखल

मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला डिसेंबर महिन्यात आरक्षणासाठी मुदत दिली होती. मात्र, आम्हाला थोडा वेळ द्या असं म्हणत सरकारने जरांगेंकडे विनंती केली. दरम्यान, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असं जरांगे म्हणाले आहेत. मुंबईतील आझात मैदानात जरांगे पाटील उद्यापर्यंत पोहोचतील.

जरांगेंना लाखो मराठा बांधव पाठिंब देत आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

News Title : Important Orders of High Court to Manoj Jarange

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना कोर्टात बोलवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Republic Day Weekend | प्रजासत्ताक दिनी फिरायला जायचंय?; मग ‘ही’ ऐतिहासिक ठिकाणे ठरतील बेस्ट ऑप्शन

Saida Imtiaz | शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

Rashmi Thackeray | ‘रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात’; भास्कर जाधवांकडून कौतुक, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर

Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!