Saida Imtiaz | शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 Saida Imtiaz | पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं जात आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे. यानंतर पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने (Saida Imtiaz) मोठा खुलासा केला आहे.

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मोठं वक्तव्य केलं आहे. तिच्या वक्तव्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने पाकिस्तानच्या वास्तवाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ही महिला दुसरी कुणी नाही तर पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सईदा इम्तियाज आहे. तिने सोशल मिडियावर पाकिस्तानी मुलांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सईदा इम्तियाजने ( Saida Imtiaz) म्हटले की, “पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती बघून मला नाही वाटत की मी कोणत्या पाकिस्तानी मुलासोबत लग्न करु शकेल. इथे वर्षांत 2 वेळा पंतप्रधान बदलले जातात, तसेच काही वर्षांत बायकांनादेखील बदललं जातं. इथे लग्न हे एकदा नाही तर खूपदा होतं,” असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री सईदा इम्तियाजने केला आहे.

तसेच, ‘मी पाकिस्तानपेक्षा दुसऱ्या देशाच्या मुलासोबत लग्न करायला पसंत करेल’, असंही ती म्हणाली आहे. सईदाचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. सईदाने क्रिकेटपटू शोएब मलिकवरच निशाणा साधला असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मिडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘तू भारतात लग्न कर आणि ते ही अभिनेता सलमान खान याच्यासोबत संसार कर’, अशी कमेन्ट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यामुळे सध्या सईदाच्या या विधानाचीच अधिक चर्चा होत आहे.

Saida Imtiaz चा शोएब मलिकवर निशाणा?

शोएब मलिकने (Shoaib Malik) सना जावेद या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं. सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. ‘खानी’ या रोमँटिक ड्रामानंतर ती प्रसिद्धीस आली.

सना आणि शोएब अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सानियाला धोका देत त्याने विवाहबाह्य संबंध ठेवले. यामुळे शोएबवर सईदाने (Saida Imtiaz) निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तानी मुलांच्या मानसिकतेबाबत आता चर्चा होत आहे.

News Title : Saida Imtiaz revelation about Pakistani marriage

महत्वाच्या बातम्या- 

Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!

Sania Mirza आणि मोहम्मद शमी लग्नबंधनात अडकणार?; चर्चांना उधाण

Ayodhya Ram Temple | अयोध्येत रामलल्लानंतर सीता आणि हनुमानही विराजणार; ट्रस्टचा मोठा प्लॅन आला समोर

Bigg Boss 17 | विकी जैननंतर टॉप 5 मधून ‘या’ तगड्या स्पर्धकाचाही पत्ता कट होणार?

Ramlalla Jewellery | सोन्या-चांदीची खेळणी ते हीरे-मोत्यांचा शृंगार; रामलल्लाच्या दागिन्यांची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये