Bigg Boss 17 | विकी जैननंतर टॉप 5 मधून ‘या’ तगड्या स्पर्धकाचाही पत्ता कट होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’चा (Bigg Boss 17) फिनाले आता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. मागच्याच आठवड्यात आयशा आणि ईशा या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या आहेत. त्यांच्यानंतर अंकिता लोखंडेचा पती विकी जैनचाही प्रवास आता इथेच थांबला आहे. यानंतर मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे टॉप 5 मध्ये सामील झाले आहेत.

टॉप 5 मधील अजून एका जनाचा पत्ता कट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून वोट देत आहेत. याच वोटिंगच्या आधारावर सर्वांत पुढे कोण आहे आणि कुणाचा पत्ता कट होणार ते दिसून येत आहे.

‘या’ स्पर्धकाला मिळाली सर्वाधिक पसंती

बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) आता मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यात लढाई होणार आहे. हे पाचही जण जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. चाहत्यांच्या वोटिंगमुळे बिग बॉसचा विजेता कोण ठरणार, हे अगोदरच सर्वांना दिसून येते आहे. फिनाले विकचा वोटिंग ट्रेंड आता समोर आला आहे.

यानुसार सर्वांत पुढे कॉमेडियन मुनव्वर फारुकी दिसून येत आहे. मुनव्वरला चाहते अधिक वोट देत आहेत. अगदी सुरुवातीपासूनच त्याने घरात छाप सोडली आहे. त्यामुळे सध्या तरी मुनव्वर फारुकी सेफ झोनमध्ये आहे. मुनव्वरला 1 लाख 92 हजार व्होट मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. 73 टक्के चाहत्यांनी त्याला व्होट दिले आहे.

मुनव्वरनंतर अभिषेक कुमारला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्याला 38 हजार 912 च्या आसपास व्होट मिळाले आहेत. तर, तिसऱ्या नंबरवर मन्नारा चोप्रा आली आहे. तिला 15 हजारच्या जवळपास व्होट मिळाले आहेत. तर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अचानक-भयानक उर्फ अरुण माशेट्टी हा देखील चौथ्या नंबरवर असल्याचं दिसून येतंय.

‘या’ स्पर्धकाचा पत्ता कट होण्याची शक्यता

अभिनेत्री अंकिता लोखंडे या लिस्टमध्ये शेवटी आली आहे. तिला फक्त 5 हजार व्होट मिळाले आहेत. त्यामुळे फिनालेपुर्वी (Bigg Boss 17) अंकितादेखील घरातून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी तिचा नवरा विकी जैन अगोदरच बाहेर पडला आहे. आत त्याच्या नंतर अंकितादेखील बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. 28 जानेवारीला शोचा अंतिम भाग होणार आहे. त्यामुळे आता मूनव्वर बाजी मारणार की मन्नारा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title-  Bigg Boss 17 Another one will be out of top 5

महत्वाच्या बातम्या- 

“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर

कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर