कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Karpuri Thakur | बुधवारी भारत सरकारने एक मोठी घोषणा करत बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देणार असल्याचे जाहीर केले. आज म्हणजेच गुरूवारी कर्पुरी ठाकूर यांची 100 वी जयंती असून हे औचित्य साधून मोदी सरकारने ही घोषणा केली. जननायक म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या कर्पुरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि राजकारणी म्हणून त्यांनी ओळख मिळवली. ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिले.

बिहारमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. कर्पुरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणात सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे नेते मानले जातात. खरं तर त्यांचा जन्म एका सामान्य न्हावी कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधी राजकारण करून आपली राजकीय खेळी खेळली. यात त्यांना यश देखील आले. असे सांगितले जाते की, आणीबाणीच्या काळात सर्व प्रयत्न करूनही इंदिरा गांधी कर्पुरी यांना अटक करू शकल्या नाहीत.

1970 आणि 1977 मध्ये मुख्यमंत्री

दरम्यान, 24 जानेवारी 1924 रोजी जन्मलेले कर्पुरी ठाकूर 1970 मध्ये पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. 22 डिसेंबर 1970 रोजी त्यांनी पहिल्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतली. विशेष म्हणजे त्यांचा पहिला टर्म केवळ 163 दिवसांचा होता. 1977 मध्ये जनता पक्षाला मोठा विजय मिळाला तेव्हाही कर्पुरी ठाकूर दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्यांना त्यांचा हा देखील कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

Karpuri Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न

त्यांनी बिहारमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत केले. त्याचबरोबर राज्यातील सर्व विभागांमध्ये हिंदीतून काम करणे बंधनकारक करण्यात आले. आपल्या कार्यकाळात त्यांनी गरीब, मागास आणि अत्यंत मागासलेल्यांच्या बाजूने अशी अनेक कामे केली, ज्यामुळे बिहारच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडून आला. यानंतर कर्पुरी ठाकूर यांची राजकीय ताकद प्रचंड वाढली आणि बिहारच्या राजकारणात ते समाजवादाचा मोठा चेहरा बनले.

लालू यादव, नितीश कुमार कर्पुरी यांचे शिष्य

बिहारमध्ये समाजवादाचे राजकारण करणारे लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे कर्पुरी ठाकूर यांचे शिष्य आहेत. जनता पक्षाच्या काळात लालू आणि नितीश यांनी कर्पुरी ठाकूर यांचे बोट धरून राजकारणाच्या युक्त्या शिकल्या. अशा परिस्थितीत बिहारमध्ये लालू यादव सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्पुरी ठाकूर यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम केले. त्याचबरोबर नितीश कुमार यांनीही अत्यंत मागासलेल्या समाजाच्या बाजूने अनेक गोष्टी केल्या.

 

राजकीय विश्लेषकांच्या मते, बिहारच्या राजकारणात कर्पुरी ठाकूर यांना दुर्लक्षित करता येत नाही. कर्पुरी ठाकूर यांचे 1988 मध्ये निधन झाले, परंतु इतक्या वर्षांनंतरही ते बिहारच्या मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या मतदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे बिहारमध्ये मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या लोकांची लोकसंख्या सुमारे 52 टक्के आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने कर्पुरी ठाकूर यांचे नाव घेत असतात. त्यामुळेच 2020 मध्ये काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ‘कर्पुरी ठाकूर सुविधा केंद्र’ उघडण्याची घोषणा केली होती. आता मोदी सरकराने कर्पुरी यांना भारतरत्न देणार असल्याची घोषणा करून मागासलेल्या समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.

News Title- Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav and Nitish Kumar’s political idol Karpuri Thakur will be posthumously honored with Bharat Ratna, the Government of India has announced
महत्त्वाच्या बातम्या –

Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती

Nita Ambani वापरतात ‘या’ बड्या कंपनीचा फोन; किंमत लाखोच्या घरात, अयोध्येत दिसली झलक

Kangana Ranaut | अयोध्येतून परतताच कंगना रनौतने केली मोठी घोषणा!

Uddhav Thackeray | “आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा”

Private Jets | ‘इच्छा नसतानाही…’; एअर होस्टेसचा अत्यंत धक्कादायक खुलासा