Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | भारतीय संघ गुरुवारपासून मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 तारखेपासून सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पण, मालिकेला सुरूवात होण्याआधीच यजमान टीम इंडियाला मोठा झटका बसला. कारण विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे.

द्रविडनं सांगितली रणनीती

किंग कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांमधून सुट्टी मागितली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्यामुळे साहजिकच एका युवा खेळाडूला संधी मिळणार आहे. याचाच दाखला देत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विराट दोन सामने खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने सोमवारी माहिती दिली.

विराट कोहलीची अनुपस्थिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची आणखी कोणाला तरी चांगली संधी ठरू शकते, असे द्रविड यांनी म्हटले आहे. भारतीय प्रशिक्षकांनी स्पष्ट केले की, कोहलीसारख्या दर्जेदार खेळाडूची अनुपस्थिती संघासाठी कठीण आहे, परंतु त्याने इतर खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.

Virat Kohli ची सुट्टी!

राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “विराटसारख्या खेळाडूची कोणत्याही संघाला उणीव भासेल हे सर्वांना माहीत आहे. आपल्याला कल्पना आहे की, तो एक असाधारण खेळाडू आहे. त्याच्या नावावर असलेले विक्रम सर्वकाही सांगून जातात. मैदानावरील त्याची उपस्थिती संघाला खूप प्रोत्साहन देते. पण, मला वाटते की ही दुसर्‍या कोणासाठी तरी पाऊल उचलण्याची संधी आहे. कारण विराटच्या अनुपस्थितीमुळे दुसऱ्या कोणाला तरी सिद्ध करण्याची संधी मिळणारआहे.”

दरम्यान, यशस्वी जैस्वालच्या आगमनानंतर शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. कारण त्याला सलामीवीर म्हणून यश आले नाही. याबद्दल द्रविड यांनी सांगितले की, मी युवा फलंदाजावर अतिरिक्त दबाव टाकू इच्छित नाही. गिल एक चांगला खेळाडू आहे.

 

तसेच कधी कधी आपण विसरतो की क्रिकेटपटू म्हणून प्रवास सुरू करायला थोडा वेळ लागतो. काही लोकांना झटपट यश मिळते. खरं तर शुभमन गिल अशा शिलेदारांपैकी एक आहे, ज्याने पहिल्या काही दिवसांत विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली आहे, असेही द्रविड यांनी नमूद केले.

विराटच्या अनुपस्थितीत कोणाला संधी?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.

News Title- Virat Kohli has pulled out of the first two Tests against England due to personal reasons and coach Rahul Dravid said this will give the youngster a chance in Team India
महत्त्वाच्या बातम्या –

Nita Ambani वापरतात ‘या’ बड्या कंपनीचा फोन; किंमत लाखोच्या घरात, अयोध्येत दिसली झलक

Kangana Ranaut | अयोध्येतून परतताच कंगना रनौतने केली मोठी घोषणा!

Uddhav Thackeray | “आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा”

Private Jets | ‘इच्छा नसतानाही…’; एअर होस्टेसचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan च्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी माहिती समोर!