Saif Ali Khan | बाॅलिवूड अभिनेता सैफ आली खान (Saif Ali Khan) याची तब्यत अचानक खालावल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. सैफच्या प्रकृतीमध्ये बिगाड झाल्याने त्याला काल मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफच्या एका साउथ चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना त्याला दुखापत झाली होती. सैफचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान त्यावर आज मुंबई येथील कोकीलाबेन या रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली.
सैफच्या प्रकृतीबाबत माहिती समोर
साउथ चित्रपटाचं चित्रिकरण सुरु असताना सैफ आली (Saif Ali Khan) खानचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला आहे. सैफ अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान याच्यासोबत करीना कपूर खान ही देखील दिसत आहे. सैफ अली खान याच्या खांद्याला फॅक्चरचं चित्र पाहयला मिळत आहे.
व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान, समोर आलेल्या महितीनुसार आता सैफ अली खान याची तब्येत व्यवस्थित असून तो कोकिलाबेन रुग्णालयातून घरी निघाला आहे. सैफ अली खान यावेळी पापाराझी यांना पाहून धन्यवाद मानता देखील दिसत आहे. हेच नाही तर करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दोघेही पोझ देताना देखील दिसत आहेत. आता सैफ अली खान याचा हात व्हिडीओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सैफची शस्त्रक्रिया पार पडली
दरम्यान, सैफ अली खानच्या शस्त्रक्रियेबाबत कोकिलाबेन हॉस्पिटलकडून आतापर्यंत कोणतंही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. तसेच सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या दुखापतीबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही.
सैफ आली खानने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, माझ्या दुखापतीनंतर मला याचा फार त्रास होत होता. शिवाय मी नवीन वर्षांचा स्वागत करण्यासाठी कुटुंबियांसोबत गेले होतो, त्यावेळी देखील मला खूप जास्त त्रास होत होता.
News Title : big health update about saif ali khan
महत्त्वाच्या बातम्या-
Apple Side Effects | या सीजनमध्ये तुम्हीही रोज सफरचंद खाताय?; मग हे वाचाच, आताच व्हा सावध!
स्पोर्टी लूक, जबरदस्त मायलेज, हीरोची ‘Xtream 125R’ बाईक लाँच, जाणून घ्या किंमत
Post Office Scheme For Womens | पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली ‘ही’ खास योजना; 2 वर्षात जमतील 2 लाख
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा झंजावात पुण्यात; ‘हे’ रस्ते राहतील बंद
Amitabh bachchan | अमिताभ बच्चन यांना आली रेखाची आठवण?, फोटो पोस्ट करत म्हणाले