Xtream 125R | मुलांना नेहमीच बाईक आणि गाड्यांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. आपल्याकडेही खूप सारे फीचर्सवाली बाइक असावी अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते. मात्र बऱ्याचदा किंमत पाहून ते स्वप्न आधुरं राहून जातं. आता हीरोने अशाच एका बाइकला लॉन्च केलं आहे. ज्यात भरपूर फीचर्स पाहायला मिळतील. यासोबतच भरपूर फीचर्ससह त्याची किंमतही परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे.
देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने ही नवीन बाईक बाजारात आणली आहे. कंपनीने Xtream 125R लाँच केली आहे. हीरोने 125 सीसी श्रेणीतील आणखी एक बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
‘Xtream 125R’ बाईकमध्ये मिळतील ‘हे’ फीचर्स
हिरो वर्ल्ड 2024 लाँच दरम्यान कंपनीने आपली नवीन बाईक (Xtream 125R) भारतीय बाजारात लॉन्च केली. या बाईकची किंमतही अगदी कमी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच याची शोरूम किंमत फक्त 95000 रुपये आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा करण्यासाठी ही बाईक ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना आता बाईक घेण्यासाठी अधिक विचार करावा लागणार नाही.
त्यांच्या बजेटमध्ये आणि भरपूर फीचर्ससह हीरोने ही नवीन बाईक बाजारात आणली आहे. या नवीन बाईकमध्ये कंपनीने रेझर शार्प स्टाइलिंग हेडलॅम्प्स अपफ्रंट दिले आहेत. तसेच, LED DRL सारखे फीचर्सदेखील आहेत. बाइकमध्ये स्प्लिट सीट आणि स्पोर्टी लूकसाठी स्प्लिट ग्रॅब रेल देखील लावण्यात आले आहे.
‘Xtream 125R’ बाईक देते ‘इतकं’ मायलेज
या नवीन बाईकमध्ये (Xtream 125R) 5 स्पीड गियरबॉक्स लावले आहेत. तसेच फ्रंटलाच 37 mm चा टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियर मध्ये मोनोशॉक फोर्क्स देखील देण्यात आला आहे. ही नवीन बाईक 5.9 सेकंड मध्येच 0-60 kmph ची स्पीड घेते. ही बाईक 66 kmpl चा मायलेज देते.
ही बाईक IBS आणि ABS या दोन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. मात्र, ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तुम्ही 20 फेब्रुवारी 2024 नंतरच तुमच्या जवळच्या डीलरशिप मधून बाईक खरेदी करू शकता.
News Title- Hero Xtream 125R Launched in India
महत्वाच्या बातम्या-
Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट
Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का
Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य
Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!
Bigg Boss 17 | ‘तुला अंकितापेक्षा कोळशाच्या खाणीचा अहंकार…’; मिडियाने विकी जैनला सुनावलं