Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!

Saif Ali Khan | अभिनेत्री करीना कपूरचा पती आणि अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) काल (22 जानेवारी) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती.

आता त्याच्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच सैफ अली खान याने स्वतः आपल्या प्रकृतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सध्या सैफचीच चर्चा अधिक रंगत आहे.

काय म्हणाला सैफ अली खान?

“ही दुखापत आणि त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया हा आम्ही केलेल्या कामाच्या जखमा आणि त्याचा परिणाम आहे. डॉक्टरांची साथ असल्यामुळेच माझी प्रकृती आता स्थिर आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि सर्व हितचिंतकांचे त्यांच्या प्रेम आणि काळजीबद्दल आभार”, असं सैफ अली खान (Saif Ali Khan) म्हणाला आहे.

सैफ अली खानला नेमकी दुखापत कशामुळे झाली याबद्दल अद्याप अधिकृतरित्या काहीच समजलं नाही. मात्र सिनेमाची शुटिंग करत असताना त्याला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्याला अशाच एका कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रंगून सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सैफ सेटवर जखमी झाला होता. त्यावेळी त्याला अॅडमिट करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याच्या प्रकृतीबद्दल चर्चा होत आहेत.

‘या’ चित्रपटात दिसणार सैफ अली खान

सैफच्या (Saif Ali Khan) फिल्मी करीअर बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘देवारा’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच सैफ अली खान जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘देवरा’ (Devara Part-1 ) हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. त्याचा पहिला भाग या वर्षी 4 एप्रिल रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मिकिलेनी सुधाकर आणि हरी कृष्ण यांनी केली आहे. एनटीआरचे ‘देवरा’ (Devara Part-1 ) मधील अ‍ॅक्शन सीन पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा अजूनच वाढली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

News Title-  Saif Ali Khan health update

महत्वाच्या बातम्या- 

3 लग्नं अन् एकाचवेळी 3 मोठ्या चुका! Shoaib Malik अडचणीत; चाहत्यांनी घेतली शाळा

Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral

Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’

Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा