Ram Mandir | किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत! सेल्फी घेण्यासाठी उडाली झुंबड; Video ‘विराट’ Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. राजकारण आणि कलेपासून ते क्रीडाविश्वातील प्रसिद्ध मंडळी याठिकाणी उपस्थित होती. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीलाही निमंत्रण देण्यात आले होते मात्र तो येऊ शकला नाही. मात्र, त्याच्या डुप्लिकेटने अयोध्येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विराटने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे कदाचित विराट अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही. सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर अचानक एक व्यक्ती टीम इंडियाच्या जर्सीमध्ये अयोध्येच्या रस्त्यावर आली अन् एकच गर्दी जमली. ही व्यक्ती विराट कोहलीसारखी हुबेहुब दिसत असल्याने उपस्थितांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

किंग कोहलीचा ड्युप्लिकेट अयोध्येत!

ड्युप्लिकेट विराटला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली. त्याच्या जर्सीवर देखील विराट असे लिहले होते. शिवाय किंग कोहलीचा फेव्हरेट नंबर 18 ही दिसत होता. तरुणांनी या व्यक्तीला घेरले आणि सेल्फी काढली. या वेळी विराटच्या डुप्लिकेटनेही विराटचीच शैली कायम ठेवली. तो विराटच्या चाहत्यांना सेल्फी देताना दिसला. लोकांनी बराच वेळ विराटच्या डुप्लिकेटचा पाठलाग करणे सोडले नाही. ही व्यक्ती जसजशी पुढे सरकली तसतसे चाहतेही मोबाईल घेऊन त्याच्या मागे धावत राहिले.

 

Ram Mandir कार्यक्रमासाठी कोहली अनुपस्थित

भारतीय संघ येत्या 25 तारखेपासून इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसल्याचे दिसते. कारण विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांमधून सुट्टी मागितली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत माहिती दिली. अद्याप विराटची रिप्लेसमेंट जाहीर करण्यात आली नाही.

25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या हैदराबाद कसोटीत विराट दिसणार नाही. पुढील कसोटी सामन्यातही तो अनुपस्थित राहणार आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्याने बीसीसीआयकडून ब्रेक मागितला होता, जो त्याला मिळाला आहे. किंग कोहली थेट तिसऱ्या सामन्यात दिसणार आहे.

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.

News Title- A duplicate of Indian team player Virat Kohli came to Ayodhya and mobbed everyone for a selfie, the video of which is going viral on social media
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | विराट-रोहितची अनुपस्थिती! जड्डूची हजेरी; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा भारताला ‘जय श्री राम’

Ayodhya Ram Mandir | अंबानी कुटुंबाकडून राम मंदिरासाठी कोट्यवधींचे दान; जाणून घ्या रक्कम

Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा

Virat Kohli ची 2 सामन्यातून माघार! चाहत्यांनी लावला वेगळाच तर्क; म्हणाले, “अनुष्का दुसऱ्यांदा…”

Bollywood च्या ‘या’ कलाकारांकडून राम मंदिरासाठी भरघोस दान; जाणून घ्या कुणी काय दिलं