Virat Kohli ची 2 सामन्यातून माघार! चाहत्यांनी लावला वेगळाच तर्क; म्हणाले, “अनुष्का दुसऱ्यांदा…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | भारतीय क्रिकेट संघ 25 तारखेपासून मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. मात्र, सलामीच्या सामन्याच्या तीन दिवस आधी विराट कोहलीने मोठा निर्णय घेत पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेतली आहे. विराटने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सुट्टी मागितली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही माहिती दिली.

लवकरच IND vs ENG थरार

किंग कोहलीने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. कोहलीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे विराट कोहलीचे वैयक्तिक कारण. विराट कोहलीचे काही चाहते दावा करत आहेत की त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. खरं तर या संदर्भात विराट कोहलीने कोणतेही अधिकृत विधान केले नाही.

मात्र, वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेण्याची विनंती बोर्डाकडे केल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बीसीसीआयने सांगितले की, विराट कोहली देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. तसे करणे हे त्याचे प्राधान्य होते, परंतु काही वैयक्तिक कारणास्तव तो पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे.

Virat Kohli ची 2 सामन्यातून माघार!

दरम्यान, अलीकडेच विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातून सुट्टी घेतली होती, त्यानंतरही चाहत्यांनी अनुष्का शर्मा गर्भवती असल्याचा दावा केला होता आणि तिच्यामुळे विराट कोहली हा सामना खेळला नाही. पण अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्या दिवशी विराटची लेक वामिकाचा वाढदिवस होता. आता चाहते अनुष्का शर्मा गर्भवती असल्यामुळे किंग कोहलीने माघार घेतली असल्याचा तर्क लावत आहेत.

 

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दीर्घकाळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले. यानंतर 2021 मध्ये दोघांना एक मुलगी झाली, तिचे नाव वामिका आहे. विराटने पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे पण अद्याप बीसीसीआयने विराटची रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही. त्यामुळे विराटच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहण्याजोगे असेल.

विराटच्या अनुपस्थितीत कोणाला संधी?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आवेश खान.

News Title- Fans have speculated that Anushka Sharma is pregnant after Virat Kohli pulled out of the first two Tests against England due to personal reasons
 महत्त्वाच्या बातम्या –

Bollywood च्या ‘या’ कलाकारांकडून राम मंदिरासाठी भरघोस दान; जाणून घ्या कुणी काय दिलं

Ram Mandir Ayodhya | “मोदी आणि योगी यांची जोडी म्हणजे जणू राम-लक्ष्मण”

Maharashtra politics | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर!

Congress | मोठी बातमी! काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता तडकाफडकी निलंबित

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान अचानक रूग्णालयात अ‌ॅडमिट; चाहते चिंतेत, नेमकं काय झालं?