Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान अचानक रूग्णालयात अ‌ॅडमिट; चाहते चिंतेत, नेमकं काय झालं?

Saif Ali Khan | बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सैफ अली खानबाबत (Saif Ali Khan) मोठी बातमी समोर आली आहे. सैफला आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सैफ अली खान रूग्णालयात दाखल

सैफच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र सैफला दुखापत कशी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सैफसोबत त्याची अभिनेत्री पत्नी करीना कपूर खानही रुग्णालयात आहे.

आता सैफ अली खान याची तब्येत स्थिर आहे. यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया झालीये. गुडघा आणि छातीला मोठी दुखापत सैफ अली खान याला झालीये. गुडघ्यावर तर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Saif Ali Khan ला नक्की काय झालं?

सैफ अली खान सध्या साऊथ चित्रपट देवरामध्ये काम करत आहे. यामध्ये तो बहिराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरही आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान जखमी झाल्याची शक्यता आहे, मात्र खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, सैफ अली खानच्या शस्त्रक्रियेबाबत कोकिलाबेन हॉस्पिटलकडून आतापर्यंत कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. तसेच सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या दुखापतीबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’च्या फिनालेपूर्वी अंकिता लोखंडेला मोठा धक्का!

Shailesh Lodha | राम मंदिरावर शैलेश लोढांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Ayodhya Ram Mandir | कोणी लाख तर कोणी कोटी रूपये, राम मंदिर उभारणीसाठी ‘या’ कलाकारांनीही केलंय दान

Ram Mandir Pran Pratishtha | “छत्रपती शिवाजी महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा आहे”

Atal Setu Accident | मुंबईतील ‘अटल सेतू’ वर पहिला खतरनाक अपघात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप