Congress | मोठी बातमी! काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता तडकाफडकी निलंबित

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जळगाव | काँग्रेसच्या (Congress) गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षातील मोठा चेहरा आणि माजी खासदार उल्हास पाटील यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. उल्हास पाटील यांच्या निलंबनानंतर ते काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘हा’ बडा नेता तडकाफडकी निलंबित

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस (Congress) सोडून शिवसना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता खान्देशात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील भाजपत प्रवेश करणार आहे.

Congress | डॉ. उल्हास पाटील भाजपत प्रवेश करणार

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने तिघांनाही काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्र देण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटना प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र तिघांनाही देण्यात आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.

डॉ. उल्हास पाटील गेल्या 30 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी राहिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत आता उल्हास पाटील भाजपत गेले तर काँग्रेसला त्याचा मोठा धक्का बसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान अचानक रूग्णालयात अ‌ॅडमिट; चाहते चिंतेत, नेमकं काय झालं?

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’च्या फिनालेपूर्वी अंकिता लोखंडेला मोठा धक्का!

Shailesh Lodha | राम मंदिरावर शैलेश लोढांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Ayodhya Ram Mandir | कोणी लाख तर कोणी कोटी रूपये, राम मंदिर उभारणीसाठी ‘या’ कलाकारांनीही केलंय दान

Ram Mandir Pran Pratishtha | “छत्रपती शिवाजी महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा आहे”