Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’च्या फिनालेपूर्वी अंकिता लोखंडेला मोठा धक्का!

Bigg Boss 17 | बिग बॉस 17 (Bigg Boss 17)चा फिनाले आता जवळच आल्यासारखे आहे. सर्वांचंच लक्ष आता विजेता कोण ठरणार?, याकडे लागलं आहे. चाहत्यांकडून विजेत्याबाबत वेगवेगळे अंदाजही बांधले जात आहेत. मात्र, त्यापुर्वीच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)ला मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे.

बिग बॉसमध्ये पक्के दावेदारच्या यादीत आयशा आणि ईशा यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र या दोघीही घरातून बाहेर पडल्या आहेत. आता यात अंकिता लोखंडेचाही नंबर लागला की काय, अशा चर्चा रंगत आहेत. कलर्स टीव्हीकडून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे याला अजूनच हवा मिळाली आहे.

‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

कलर्स टीव्हीने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. यात जनतेने बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा विजेता निवडावा, असे सांगण्यात आले आहे. यासोबतच पोस्टमध्ये फक्त मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांचेच नाव देण्यात आले आहे.

बिग बॉसच्या टॉप 3 मध्ये मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांचेच नाव असून अंकिताला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचेही आता म्हटले जात आहे. त्यामुळे आयशा आणि ईशानंतर अंकिताही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार असल्याची चर्चा होत आहे.

‘बिग बॉस’ मधून अंकिताचा पत्ता कट?

अंकिता ही तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायम चर्चेत होती. तिचा पती विकी जैनसोबत बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) सामील झाल्यानंतर त्यांच्यात प्रत्येक दिवशी भांडण झाली. बऱ्याचदा ही भांडण खूप टोकाची होती. दोघांनीही लग्नाचा पश्चात्ताप देखील झाल्याचे बोलून दाखवले. त्यात अंकिता आणि विकी जैनच्या कुटुंबियांतील आपसिक वादही समोर आले.

अंकिताची आई आणि सासु या दोघींनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावत अनेक आरोप केले होते. त्यामुळे बिग बॉसमध्ये नसूनही विकी जैनची आई सोशल मिडियावर चर्चेत होती. यावर बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रींनी अंकिताची बाजू घेतली होती. अंकिताची सासु तिला कितीच त्रास देते, असे बोलले गेले. तर, विकी जैन आणि अंकिताच्या नात्यात पुन्हा एकदा सुशांत सिंहचा मुद्दा आल्याचे दिसून आले. कधीकाळी अंकिता आणि सुशांत नात्यात होते. मात्र, अंकिताने बिग बॉसमध्ये त्याचा सतत उल्लेख केला. सुशांतचा उल्लेख हा विकी जैनसोबत त्याच्या घरच्यांनाही चांगलाच खटकला. बिग बॉसच्या नादात त्यांच्या आयुष्याचा तमाशाच इथे पाहायला मिळाला. मात्र, एवढे सगळे होऊनही अंकिता बिग बॉसच्या (Bigg Boss 17) घरातून बाहेर पडली यावरून आता चर्चा रंगत आहे.

News Title- Bigg Boss 17 Ankita Lokhande big revelation

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir Pran Pratishtha | “छत्रपती शिवाजी महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा आहे”

Atal Setu Accident | मुंबईतील ‘अटल सेतू’ वर पहिला खतरनाक अपघात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Ram Mandir Pran Pratishtha | आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंंदिरात राहतील- नरेंद्र मोदी

Ram Mandir | ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’; प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीचं पहिलं दर्शन

Stock Market | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित शेअर बाजार बंद; ‘या’ दिवशी होणार पुन्हा सुरू