Shailesh Lodha | राम मंदिरावर शैलेश लोढांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shailesh Lodha | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील ‘तारक मेहता’ची भूमिका करणारे अभिनेते, लेखक तथा कवी शैलेश लोढा पुन्हा एकदा TMKOC च्या मेकर्सवर भडकले आहेत. ते ‘साहित्य आजतक लखनऊ’च्या मंचावर बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिरावरून होत असलेल्या राजकारणावरही मोठं भाष्य केलं आहे.

देशात सगळीकडे राममय वातावरण झाले आहे. आता लोक पहाटे गुड मॉर्निंग नाही तर ‘राम राम’ म्हणत आहेत. हा देशात मोठा बदल होत असल्याचे शैलेश लोढा यांनी सांगितले. त्यांनी काही वर्षांपुर्वी TMKOC च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप करत ही मालिका सोडली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे शैलेश लोढा (Shailesh Lodha) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले ‘तारक मेहता’ ?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांची खिल्ली उडवत शैलेश यांनी म्हटले की,”मी माझ्या आयुष्यातील सर्व चष्मे काढून टाकले आहेत. त्यामुळे चष्मा उलटा ठेवला की सरळ याने मला काही फरक पडत नाही,” असे म्हणत शैलेश (Shailesh Lodha) यांनी चष्मा लावला. त्यांनी एकप्रकारे TMKOC च्या निर्मात्यांची खिल्ली उडवली आहे.

शैलेश लोढा यांना देखील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. आज ते देखील अयोध्येत सामील झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी राम मंदिरावर मोठे भाष्य केलं. आता फक्त राम दरबार आहे. आज चर्चा फक्त रामाची असेल. आता एक नवे पर्व सुरू झालं आहे. आपण जयजयकार का करू नये, माथ्याला टिळक का लावू नये, प्रत्येकाला आपल्या धर्मावर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले आहेत.

राम मंदिराचा उत्सव हा निवडणुकीशी जोडण्यात येऊ नये. राम मंदिर बनणारच असे आपल्या जाहीरनाम्यात कोणी लिहिलं होतं? ज्यांनी कायदेशीर लढाई लढली, त्यांनी तसं म्हटलं तर ते बरोबर आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही यावर निवडणुकीबद्दल बोलू नये. जगात आपली प्रतिमा निर्माण करणाऱ्यालाच मते दिली जातात. जे जगासाठी काही करतात त्यांना मते दिली जातात. त्यामुळे राम मंदिर आणि राजकारण वेगळे ठेवले तर बरे होईल, अशी रोखठोक प्रतिक्रिया शैलेश लोढा यांनी दिली आहे.

“मी भाग्यशाली की हा क्षण…”

राम मंदिर सोहळ्यासाठी शैलेश लोढा (Shailesh Lodha) अयोध्येत पोहोचले आहेत. “राम जिथे असले पाहिजे तिथे सर्वत्र आहे. काल मी अयोध्येला पोहोचलो, तिथे सगळीकडे भगवा रंग दिसला. सर्वत्र श्री रामाचे फोटो सजवले होते. ‘मेरे घर राम आये हैं’ या गाण्याने प्रत्येक क्षण आनंदी होता. हे सर्व नवे पर्व कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करत होतो. त्यामुळे मी भाग्यवान आहे की, मला हे क्षण बघायला मिळाला. असे शैलेश लोढा यांनी म्हटले.

News Title-  Shailesh Lodha on Ram mandir Politics

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | “नरेंद्र मोदींसारखा हिंदूंचं समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही”

Ram Mandir Inauguration Day | अवधपुरी झाली राममय; सोहळ्यासाठी भल्या पहाटे ‘हे’ स्टार्स अयोध्येत दाखल

Team India | जय श्री राम…! भारतीय खेळाडूचं शतक प्रभू श्री रामाला समर्पित

Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल