Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

Ram Mandir | आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येतील भव्य राम मंदिरात पार पडत आहे. या कार्यक्रमाने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमाच्या मुहूर्तावर देशातील सर्वच बाजारपेठांमध्ये दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून जय्यत तयारी दिसून येत आहे. रामललाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशातील बाजारपेठांमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

दिवाळीत ज्या पद्धतीने खरेदी केली जाते तसेच काहीसे पाहायला मिळत आहे. भाविक पूजेच्या वस्तू असोत किंवा सजावटीच्या वस्तू या घरी आणण्यात व्यग्र आहेत. देशभरातील राम मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी 1 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

22 जानेवारीला होत असलेल्या कार्यक्रमासाठी देशातील बाजारपेठांमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. भगवे झेंडे, प्रभू श्रीराम यांची मूर्ती, पणत्या, आकर्षक रोषणाईसाठी विविध प्रकारचे बल्ब अशा नाना प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी भाविक सरसावले आहेत. राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) म्हणजेच कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचे उद्घाटन हा सण साजरा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येत आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून या सणाच्या निमित्ताने देशभरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभू रामाशी संबंधित अनेक वस्तू विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे 22 जानेवारीच्या तयारीसाठी देशभरात 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे.

Ram Mandir अन् देशभर दिवाळी

आज काही राज्यांमध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण, दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहणार आहेत आणि व्यापारी सर्वसामान्यांसह श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करत आहेत. खंडेलवाल यांनी आणखी सांगितले की, 22 जानेवारीला दिल्लीत 2 हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. देशभरात 30 हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. घरे, बाजार, मंदिरे आदी ठिकाणी सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी आहे.

तसेच मातीचे दिवे व मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या दिवशी दिल्लीतील दुकानांबाहेर सर्वसामान्यांची गर्दी जशी जमते तशीच गर्दी आता होत आहे. प्रभू श्री रामाचे झेंडे आणि राम पताकांची मागणी बाजारात इतकी आहे की त्यांचा तुटवडा जाणवत आहे, असेही त्यांनी सांगितले.

News Title- Ram Mandir Inauguration Program has generated a turnover of over 1 Lakh Crores in the market
महत्त्वाच्या बातम्या –

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना

Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral

Ram Mandir | चेहऱ्यावर हिजाब अन् मुखी जय श्री राम! 1400 किमी पायी प्रवास; मुंबईची तरूणी अयोध्येत दाखल

Entertainment News | बच्चन कुटुंबातील वादामागचं खरं कारण आलं समोर!