Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mira Road Riots | अयोध्येत होत असलेल्या रामललाच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. आज 22 जानेवारी रोजी रामलला भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभर जल्लोषाचे वातावरण असून शोभायात्रा देखील काढल्या जात आहेत. मात्र, रविवारी राजधानी मुंबईजवळील मीरा रोड परिसरात सनातन यात्रेवर हल्ला करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हल्लेखोरांनी केलेल्या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तोडफोड करताना हल्लेखोरांनी रस्त्यावर ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा दिल्याचे बोलले जात आहे. या गोंधळाचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री उशिरा मीरा रोडच्या नया नगर भागात दोन गटांनी रॅली काढली, ज्यामध्ये किरकोळ वाद झाला.

सनातन यात्रेवर हल्ला

मीरा भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांनी हा वाद यशस्वीपणे मिटवला. पण, या वादामुळे अयोध्येत सोमवारी राम मंदिराचा अभिषेक होत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोरांनी प्रभू श्री रामाचे झेंडे फाडून तणाव निर्माण केला. ज्या वाहनांवर श्री राम नावाचे झेंडे लावण्यात आले होते त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, किरकोळ वाद झाला होता. तसेच लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. या घटनेच्या संदर्भात कोणतीही जातीय हिंसाचाराची नोंद झाली नाही. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा वाद चिघळू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवा लक्षात घेऊन खबरदारी बाळगली जात आहे.

Mira Road Riots अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे आदेश दिले आहेत. तपासाच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनावेळी होणारे कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी अधिकारी सतर्क आहेत. पोलीस सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून आज प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिर रामभक्तांसाठी खुले होणार आहे.

हिंदू संघटनांकडून रविवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास यात्रा काढली जात होती. 21 जानेवारीच्या मध्यरात्री 12 नंतर ही घटना घडली. बिघडलेली परिस्थिती पाहून मुंबई पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले

मीरा रोड पोलिसांनी फ्लॅग मार्च काढल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले. ज्या भागात ही घटना घडली तो मुस्लीमबहुल परिसर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसराला लागून असलेल्या भागात गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या समाजातील लोकच सनातन यात्रा काढत होते.

News Title- Sanatan Yatra was attacked in Mira Road after which the Mumbai Police has appealed not to believe rumours

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल

“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना

Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral

Ram Mandir | चेहऱ्यावर हिजाब अन् मुखी जय श्री राम! 1400 किमी पायी प्रवास; मुंबईची तरूणी अयोध्येत दाखल