Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना

Ram Mandir | तब्बल 500 वर्षांनंतर आजचा ऐतिहासिक दिवस आला असून अयोध्येत प्रभू रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी हा कार्यक्रम होत असल्याने या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. याच दिवशी सर्व शुभ कार्ये आटपून घ्यावी अशी अनेकांची भावना तयार झाली. याशिवाय ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी देखील याच दिवशी बाळाचा जन्म व्हावा अशी मागणी डॉक्टरांकडे केली. खरं तर काही महिलांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये रात्री 12 ते 2.30 च्या दरम्यान सुमारे 17 मुलांची प्रसूती झाली. या मुलांना जन्म देणाऱ्या मातांनाही आनंद होत आहे की, श्रीरामांसोबतच त्यांच्या घरी देवाच्या रूपात एका बालकाचे आगमन झाले आहे. ग्वाल्हेरमध्ये 22 जानेवारीला रात्री 12:02 वाजता सलोनी या महिलेने पहिल्यांदा मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म होताच घरी रामलला आले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

साक्षात रामलला आज घरी आले

आई बनलेल्या सलोनीसाठी जणू आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस बनला आहे. मुलाच्या जन्मावर आनंदी असलेली सलोनी म्हणते की, एकीकडे श्री राम अयोध्येत आले आहेत, तर दुसरीकडे देवाची भेट म्हणून माझ्या घरी मुलाचे आगमन झाले आहे. आज साक्षात रामलला घरी आल्यासारखे वाटत आहे. ही स्वप्नपूर्ती असल्याचेही तिने सांगितले.

सलोनीप्रमाणेच नेहा या महिलेने देखील 12.53 वाजता मुलाला जन्म दिला. या मुलाची आजी सांगते की, आज श्री राम अयोध्येत आले आहेत आणि आमच्या घरी नवीन पाहुणा आला आहे. जेव्हा आमची सून गरोदर राहिली आणि डॉक्टरांनी जानेवारीच्या आसपास प्रसूतीचा अंदाज वर्तवला तेव्हा आमच्या मनात होते की प्रसूती 22 जानेवारीला व्हावी. देवाने आमचे ऐकले अन् आमची इच्छा पूर्ण केली.

Ram Mandir उद्घाटन अन् नवीन पाहुण्याचं आगमन

दरम्यान, ग्वाल्हेर जिल्ह्यात आज 22 जानेवारीला सुमारे 200 बालके जन्माला येणार आहेत. ज्या घरांमध्ये चिमुकल्याचे आगमन होत आहे, त्या घरांमध्ये आजच्या ऐतिहासिक दिवशी त्यांना रामाची भेट मिळाली आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. लोक इतके आनंदित आहेत की त्यांनी घरी श्री रामाच्या रूपात बालकाला आणण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत.

डॉक्टरांनी सांगितले की, अयोध्येतील श्री राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू रामाचा अभिषेक होत आहे. ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा संस्मरणीय दिवस आहे. अनेकांनी याच दिवशी प्रसूती व्हावी यासाठी विनवणी केली होती. आम्ही शक्य तितका प्रयत्न केला. 22 जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये अनेक मुलांचा जन्म झाला. हा दिवस आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित आहे.

News Title- Ram Mandir After giving birth to a baby in Gwalior, Madhya Pradesh, women today expressed the feeling that Lord Ram had actually come home
महत्त्वाच्या बातम्या –

Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral

Ram Mandir | चेहऱ्यावर हिजाब अन् मुखी जय श्री राम! 1400 किमी पायी प्रवास; मुंबईची तरूणी अयोध्येत दाखल

Entertainment News | बच्चन कुटुंबातील वादामागचं खरं कारण आलं समोर!

Ram Mandir | मी पण राम मंदिराच्या आंदोलनात होतो, त्यामुळे मलाही…- गुणरत्न सदावर्ते

Pune News | अजित पवारांना होम पीचवरच धक्क्यावर धक्के, आता…