Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | आजचा दिवस तमाम रामभक्तांसाठी खूप खास असणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. संपूर्ण भारतभर रोषणाई करण्यात आली आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहेत. प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केलेले अनेक मोठे चेहरे अयोध्येत पोहोचले आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे विराट कोहली. भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली अयोध्येत दाखल झाल्याचे कळते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की किंग कोहली अयोध्येत दाखल झाला. खरं तर विराटचा ताफा पाहण्यासाठी एकच गर्दी जमली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी आकर्षक रोषणाईने सजली आहे.

सर्वत्र राम मंदिराचा उत्साह

या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. विराटच्या ताफ्यातील अनेक आलिशान गाड्यांची रांग व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी रस्त्यावर या ताफ्याभोवती चाहते दिसत होते. विराटशिवाय इतरही अनेक खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, कपिल देव, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नावाचाही समावेश आहे.

Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री!

दरम्यान, रविवारीच काही माजी खेळाडूंनी अयोध्या गाठली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रातील नामांकित मंडळींना निमंत्रण दिले आहे. बॉलिवूड कलाकारांसह खेळाडूंचा आज अयोध्येत मेळा दिसेल यात शंका नाही. तसेच विविक्ष पक्षाची राजकीय मंडळी देखील अयोध्येत पोहोचत आहे.

 

भारतीय संघ आगामी काळात मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. या जोडीला अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.

पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आवेश खान.

News Title- Virat Kohli entering Ayodhya is going viral a video
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | चेहऱ्यावर हिजाब अन् मुखी जय श्री राम! 1400 किमी पायी प्रवास; मुंबईची तरूणी अयोध्येत दाखल

Entertainment News | बच्चन कुटुंबातील वादामागचं खरं कारण आलं समोर!

Ram Mandir | मी पण राम मंदिराच्या आंदोलनात होतो, त्यामुळे मलाही…- गुणरत्न सदावर्ते

Pune News | अजित पवारांना होम पीचवरच धक्क्यावर धक्के, आता…

Manoj Jarange | मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विनंती, म्हणाले…