Manoj Jarange | मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विनंती, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जिवाची परवा न करता आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारला वारंवार सांगून सुद्धा यावरती कोणतीच भूमीका घेण्यात आलेली नाहीये. शिवाय जरांगे पाटलांनी सरकारला मुदत देखील दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची बीड येथे जाहीर सभा पार पडली होती. त्यावेळेस त्यांनी सरकारला इशारा दिला होता. सभेत बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले होेते की, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. मात्र त्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईमध्ये उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 20 जानेवारीला जरांगे बीडमधून रवाना झाले आहेत. 26 जानेवारीपर्यंत जरांगे मुंबईला पोहचणार आहेत. मात्र जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी एक विनंती केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्या दूर करण्याचं काम सुरु केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, आरक्षणासाठी यंत्रणा काम करत आहेत. त्या त्रुटी दूर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही मराठा समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. राज्यात कुणबी नोंदी मिळत आहे. त्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

“आंदोलनाचा जनतेला त्रास होत आहे”

एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) आंदोलन थांबवलं पाहिजे. त्यांच्या आंदोलनाचा जनतेला त्रास होत आहे. आरक्षणाविषयी आम्ही बैठक घेतली होती. या बैठकीला सर्व अधिकारी होते.

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाणार आहे, असं देखील शिंदे म्हणाले.

जरांगेंना दिल्या शुभेच्छा

जरांगेंसाठी (Manoj Jarange) ही फार मोठी लढाई आहे. त्यामुळे जरांगेंना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण जरांगे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी उत्साही होतं. या वेळी जरांगेंच्या तीनही मुलींनी आपल्या वडिलांना जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मला लहान मुलीने सांगितलं आहे की, पप्पा 26 जानेवारीला शाळेत कार्यक्रम आहे, विजय घेऊन याल तर डायरेक्ट शाळेत विजय घेऊन या, असं जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

News Title :  chief minister eknath shinde requested manoj jarange

महत्त्वाची बातम्या-

Nails Eating Habits | …म्हणून लोक नखं खातात; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Shoaib Malik च्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया देत सानिया मिर्झाने केला मोठा गौप्यस्फोट!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना म्हणाले ‘मूर्ख’; ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

Plane crashed in Afghanistan | सर्वात मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तानात कोसळलं

Ram Mandir | 22 जानेवारीला काय बंद काय चालू?; वाचा एका क्लिकवर